VIDEO : वाह रे वाह! बसमध्ये सीट मिळाली नाही म्हणून बांधला पाळणा, व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:55 AM2024-05-21T11:55:52+5:302024-05-21T11:58:11+5:30

Viral Video : एका व्यक्तीने बसमध्ये सीट मिळाली नाही म्हणून चक्क बसमधील खांबाच्या मदतीने एक पाळणा बांधला आणि त्यात झोपला.

Man chills in hammock inside bus video goes viral | VIDEO : वाह रे वाह! बसमध्ये सीट मिळाली नाही म्हणून बांधला पाळणा, व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

VIDEO : वाह रे वाह! बसमध्ये सीट मिळाली नाही म्हणून बांधला पाळणा, व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

Viral Video : काही दिवसांआधीच एक महिला विमानात बॅग ठेवायच्या कप्प्यात जाऊन झोपल्याचा व्हिडीओ समोर आला होता. सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा झाली. सोशल मीडियावर अशा घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. एका व्यक्तीने बसमध्ये सीट मिळाली नाही म्हणून चक्क बसमधील खांबाच्या मदतीने एक पाळणा बांधला आणि त्यात झोपला. बसमधील लोक आणि कंडक्टरने त्याला असं न करण्यास सांगितले पण त्याने काही ऐकलं नाही. 

@JoshyBeSloshy नावाच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात बसमधील प्रवासी आणि कंडक्टर या व्यक्तीला असं करण्यास मज्जाव करत आहे. पण व्यक्ती ओरडून ओरडून बोलू लागते. व्यक्ती कंडक्टरला म्हणाला की, 'मला कुठेच बसमध्ये पाळणा बांधता येत नाही असा बोर्ड दिसत नाहीये. म्हणून तुम्ही लोक काहीच बोलू नका'. नंतर व्यक्तीने पाळण्यात स्वत:ला गुंडाळून घेतलं.

इतकंच नाही तर व्यक्ती पाळणा गोल गोल फिरवते आणि त्यात स्वत:ला अडकवून घेते. व्यक्तीने बस पुढे नेण्यास सांगितलं, पण ड्रायव्हर काही बस पुढे नेण्यास तयार नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. या व्हिडीओवर लोक भरभरून मजेदार कमेंट्स करत आहेत.

एका यूजरने लिहिलं की, असा विचार करा की, तुम्ही ऑफिसला पोहोचायला लेट झाला आणि तुम्ही अशी घटना घडल्याचं सांगितलं तर तुमचा बॉस विश्वास ठेवेल का? दुसऱ्याने लिहिलं की, सोशल मीडिया नसता तर माहितच पडलं नसतं की, जगात कसे कसे नमूने आहेत. अशा अनेक मजेदार कमेंट्स लोक करत आहेत.

Web Title: Man chills in hammock inside bus video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.