लस घ्यायची नाही म्हणून यांचे प्रताप! एकजण झाडावर चढुन बसला तर दुसऱ्याने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 07:44 PM2022-01-20T19:44:53+5:302022-01-20T19:49:21+5:30

एक व्यक्ती कोरोनाची लस घ्यावी लागू नये, म्हणून थेट झाडावरच चढतो. यानंतर प्रशासनाच्या लोकांनी या व्यक्तीला झाडावरुन खाली उतरवलं आणि लस दिली. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नदीच्या काठावर अधिकाऱ्यांनाच मारताना दिसत आहे.

man climb tree to avoid vaccination other man beats medical officer to not take vaccine | लस घ्यायची नाही म्हणून यांचे प्रताप! एकजण झाडावर चढुन बसला तर दुसऱ्याने केली मारहाण

लस घ्यायची नाही म्हणून यांचे प्रताप! एकजण झाडावर चढुन बसला तर दुसऱ्याने केली मारहाण

googlenewsNext

देशभरात लसीकरण मोहिमेला (Corona Vaccination in India) सुरुवात होऊन जवळपास एक वर्ष झालं आहे. मात्र, अजूनही अनेकांच्या मनामध्ये लसीबद्दल गैरसमज आहेत. सध्या बलियामधून असेच काही व्हिडिओ समोर आले आहेत, जे पाहून तुम्हाला हसूही येईल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्या पाहून वाईटही वाटेल. व्हिडिओमध्ये (Vaccination Videos) पाहायला मिळतं, की एक व्यक्ती कोरोनाची लस घ्यावी लागू नये, म्हणून थेट झाडावरच चढतो. यानंतर प्रशासनाच्या लोकांनी या व्यक्तीला झाडावरुन खाली उतरवलं आणि लस दिली. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नदीच्या काठावर अधिकाऱ्यांनाच मारताना दिसत आहे.

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बलिया येथे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाची टीम शेत, गाव आणि अगदी नदीच्या काठावर जाऊनही लोकांना लस देत आहे. मात्र, इथल्या अनेकांना लसच घ्यायची नसल्याने हे लोक आरोग्य विभागाच्या टीमसोबतच भांडताना दिसत आहेत. ही टीम दिसताच कोणी पळ काढताना, कोणी झाडावर चढताना तर कोणी अधिकाऱ्यांनाच मारहाण करताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या पहिल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लस घ्यायची नसल्याने लसीकरण करणाऱ्या टीमसमोरच झाडावर चढल्याचं पाहायला मिळालं. आरोग्य विभागाची टीम या व्यक्तीला समजावून आणि त्याचा गैरसमज दूर करून त्याला झाडावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करते. अखेर हा व्यक्ती झाडावरुन खाली उतरतो. हा व्हिजिओ हंडिहा कला येथील असून व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव विकास खंड असं आहे.

व्हायरल होणारा दुसरा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या बलिया येथील असल्याचं ANI नं सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लस देण्यासाठी गेलेल्या टीमला वारंवार पकडत आहे, सोबतच त्यांचे मास्कही ओढताना दिसत आहे. इतकंच नाही तर या व्यक्तीने आरोग्य विभागाच्या टीममधील लोकांनाच मारहाण करत खाली पाडल्याचंही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. हा व्हिडिओ सरयू नदीच्या किनाऱ्यावरील असल्याचं सांगितलं जात आहे.

Web Title: man climb tree to avoid vaccination other man beats medical officer to not take vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.