Viral Video: लग्नात डीजेवर नाचता नाचता व्यक्तीचा मृत्यू, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 05:10 PM2022-05-22T17:10:41+5:302022-05-22T17:15:06+5:30
एका व्यक्तीचा नाचता नाचता मृत्यू झाला आहे. लग्नात नाचताना ही व्यक्ती कोसळली आणि तिचा जागच्या जागी जीव गेला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मृत्यू कधी कुठे कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. हसताना, बोलताना, चालताना, नाचतानाही धडधाकट दिसणाऱ्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो. असाच एक मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका व्यक्तीचा नाचता नाचता मृत्यू झाला आहे. लग्नात नाचताना ही व्यक्ती कोसळली आणि तिचा जागच्या जागी जीव गेला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Man died while dancing).
लग्न म्हटलं की धम्माल, मजा-मस्ती, नाचगाणं आलंच. अशाच एका लग्नाच्या पार्टीचा हा व्हिडीओ आहे. जिथं एक व्यक्ती दोन महिलांसोबत डान्स करत होती. पण काही क्षणातच हे आनंदाचं वातावरण शोकाकुल वातावरणात बदललं. कारण डान्सचा आनंद लुटणाऱ्या या काकांचा नाचता नाचता जागच्या जागीत मृत्यू झाला आहे.
व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती दोन महिलांसोबत डान्स करतो आहे. शशी कपूरचं बदन पे सितारे लपेटे हुए हे गाणं ऐकायला येतं आहे. ही व्यक्ती या गाण्याचा पुरेपूर आनंद घेते आहे. अगदी मन लावून या गाण्यावर डान्स करते आहे. व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत. त्यांचा डान्स पाहून तिथं असलेले लोकही त्यांना प्रोत्साहित करत आहेत. टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करत आहेत.
अचानक या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागतं. तिचा श्वास फुलू लागतो. त्यामुळे ती व्यक्ती डान्स करणं थांबवतात आणि स्टेजवर बसते. तितक्यात त्यांच्यासोबत नाचणाऱ्यापैकी एक महिला त्यांना काय झालं म्हणून विचारायला जाते. काही कळायच्या आतच ते धाडकन स्टेजवर कोसळतात. जागच्या जागी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.
हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. पण प्रतीक दुआ नावाच्या फेसबुक युझरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मृत्यूची काही वेळ नाही, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत.
यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने म्हटलं आहे ही मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे इतक्या वयाच्या व्यक्तींच्या हृदयावर खूप परिणाम होतो. या व्यक्तीच्या मृत्यूचं कारण मोठ्या आवाजात लावण्यात आलेलं गाणं असू शकतं. कदाचित या व्यक्तीला हार्ट अटॅक आला असावा.