दुर्दैवी! बर्थ डेच्या दिवशीच काळाने घात घातला; पत्नी-मुलांसमोरच ‘त्याने’ प्राण सोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 07:17 PM2021-09-23T19:17:54+5:302021-09-23T19:30:11+5:30

ही घटना ब्राझीलमधील आहे. याठिकाणी ४३ वर्षीय गिल्सन(Gilson Do Nascimento) ने स्वत:च्या वाढदिवसानिमित्त बर्थ डे पार्टी आयोजित केली होती.

Man Dies After Beer Keg Explodes In His Face At His Own Birthday Party | दुर्दैवी! बर्थ डेच्या दिवशीच काळाने घात घातला; पत्नी-मुलांसमोरच ‘त्याने’ प्राण सोडला

दुर्दैवी! बर्थ डेच्या दिवशीच काळाने घात घातला; पत्नी-मुलांसमोरच ‘त्याने’ प्राण सोडला

Next
ठळक मुद्देबीयर कॅग ही ती गोष्ट आहेत ज्यात बीयर स्टोअर केल्या जाऊ शकतात.एक मेटल आणि प्लास्टिकपासून बनवलेली इलेक्ट्रॉनिक आयटम आहेबीयर केगला दुरुस्त करताना एक मोठी दुर्घटना घडली.

वाढदिवसाच्या पार्टीतच एका व्यक्तीचा जीव गेल्यानं मोठी खळबळ माजली. या व्यक्तीनं बीयर केज मागवलं होतं. परंतु त्यात बिघाड असल्याने बर्थ डे पार्टी सुरु असतानाच तो ते दुरुस्त करू लागला. पण त्याचवेळी एक दुर्दैवी अपघात घडला अन् पत्नी-मुलांसह कुटुंबासमोर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कुठे घडलंय हे जाणून घेऊ

ही घटना ब्राझीलमधील आहे. याठिकाणी ४३ वर्षीय गिल्सन(Gilson Do Nascimento) ने स्वत:च्या वाढदिवसानिमित्त बर्थ डे पार्टी आयोजित केली होती. त्यासाठी त्याने बीयर कॅग मागवले होते. बीयर कॅग ही ती गोष्ट आहेत ज्यात बीयर स्टोअर केल्या जाऊ शकतात. हे एक मेटल आणि प्लास्टिकपासून बनवलेली इलेक्ट्रॉनिक आयटम आहे. परंतु बर्थ डे पार्टी साजरी करत असताना त्यातून बीयर येणे बंद झालं. काहीतरी तांत्रिक बिघाड झाला म्हणून दुरुस्त करणाऱ्या गिल्सनला हा त्याच्या आयुष्यातील सर्वात घातक निर्णय असेल असं वाटलं नव्हतं. त्याने Beer Keg उचललं आणि त्यावर हात आपटून ड्रिंक बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्यावेळी जे घडलं ते पाहून सगळेच हैराण झाले.

व्यक्तीची पत्नी, बहिण अन् १५ वर्षाचा मुलगा उपस्थित

मिरर यूकेच्या बातमीनुसार, गिल्सनच्या पुतण्याने स्थानिक माध्यमांना माहिती दिली की, बीयर केगला दुरुस्त करताना एक मोठी दुर्घटना घडली. केगमधून तुटलेला धातूचा तुकडा बाहेर पडला आणि तो थेट गिल्सनच्या डोक्यावर जाऊन आदळला. या दुर्घटनेत गिल्सनचा जागीच मृत्यू झाला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा गिल्सनची पत्नी, बहिण आणि १५ वर्षाचा मुलगा समोर उपस्थित होता. तसेच कुटुंबातील ज्या सदस्यांनी ही दुर्घटना पाहिली त्यांच्या चेहऱ्यावरील सगळे रंग उडाले. गिल्सन ६ वर्ष कॅन्सरशी लढा देऊन बरा झाला होता. कुटुंबातील लोक गिल्सनच्या वाढदिवसामुळे खूप आनंदित होते. सध्या पोलिसांनी हे प्रकरण दुर्घटना म्हणून पाहिलं आहे. परंतु या घटनेची सर्व अँगलने चौकशी होणार असल्याचं पोलीस म्हणाले.

Web Title: Man Dies After Beer Keg Explodes In His Face At His Own Birthday Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात