खतरनाक VIDEO! रस्त्यात चालताना झाडीत वाघ दिसला; तरुण वाघोबाला 'हॅलो ब्रदर' म्हणाला, अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 10:47 PM2021-07-19T22:47:09+5:302021-07-19T22:47:25+5:30

दुधवा व्याघ्र संरक्षण प्रकल्पात शेराला भेटला सव्वाशेर; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Man In Dudhwa Tiger Reserve Teased A Tiger Saying Hello Brother Hidden In Bushes | खतरनाक VIDEO! रस्त्यात चालताना झाडीत वाघ दिसला; तरुण वाघोबाला 'हॅलो ब्रदर' म्हणाला, अन् मग...

खतरनाक VIDEO! रस्त्यात चालताना झाडीत वाघ दिसला; तरुण वाघोबाला 'हॅलो ब्रदर' म्हणाला, अन् मग...

googlenewsNext

लखीमपूर खीरी: वाघाला समोर पाहताच अनेकांची घाबरगुंडी उडते. मात्र काही जण शेरास सव्वाशेर ठरतात. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीतील दुधवा व्याघ्र संरक्षण प्रकल्पात याचाच प्रत्यय देणारी घटना घडली आहे. एक वाटसरूला झाडीत लपलेला वाघ दिसला. वाटसरूनं त्याला 'हॅलो ब्रदर' म्हटलं. त्यानंतर वाघानं काहीच केलं नाही. तो अगदी शांतपणे बसून होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ नेमका कधी चित्रित करण्यात आला आहे त्याबद्दलची माहिती मिळालेली नाही. मात्र तो दुधवा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाजवळ असलेल्या मंझर पूरब रेल्वे स्थानक परिसरातला आहे. वाघ रेल्वे रुळांजवळ असलेल्या झाडीत लपून बसला होता. कारमधून चाललेले लोक त्याला पाहून थांबले. त्यातल्या एकानं वाघाला 'हॅलो ब्रदर' म्हटलं. वाघानं त्यांना पाहिलं. मात्र तो अगदी शांतपणे बसून होता.

व्हायरल व्हिडीओतील संवाद पाहून कार वाघापासून सुरक्षित अंतरावर असल्याचं समजतं. याशिवाय कारची काचदेखील बंद आहे. काच बंद असलेल्या कारमधूनच एका व्यक्तीनं वाघाला 'हॅलो ब्रदर' म्हणत हाक दिली. त्यानंतरही वाघ अतिशय शांतपणे बसून होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Web Title: Man In Dudhwa Tiger Reserve Teased A Tiger Saying Hello Brother Hidden In Bushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.