देसी जुगाड! बंद पडलेला TV सुरू करण्यासाठी 'त्याने' हातात काठी घेतली अन्...; Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 04:25 PM2022-04-17T16:25:54+5:302022-04-17T16:27:50+5:30

Indian Jugaad Funny Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, अचानक एक व्यक्ती घरामध्ये बंद असलेल्या टीव्हीवर काठीने मारू लागतो.

man fix tv with stick indian jugaad funny video viral on social media | देसी जुगाड! बंद पडलेला TV सुरू करण्यासाठी 'त्याने' हातात काठी घेतली अन्...; Video तुफान व्हायरल

देसी जुगाड! बंद पडलेला TV सुरू करण्यासाठी 'त्याने' हातात काठी घेतली अन्...; Video तुफान व्हायरल

Next

नवी दिल्ली - देशभरात लोक आपल्या कल्पनाशक्तीला चालना देऊन जुगाड करत असतात. काही जुगाड पाहून तर डोक्याला हात लावण्याची वेळ येते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जुगाडचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती टीव्ही सुरू करण्यासाठी ज्या प्रकारचा जुगाड करत आहे, ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. विशेष बाब म्हणजे व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीचा जुगाड काम करतो आणि शेवटी जे काही घडतं, ते पाहून तुम्हीही चकीत व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, अचानक एक व्यक्ती घरामध्ये बंद असलेल्या टीव्हीवर काठीने मारू लागतो. काही वेळातच हा व्यक्ती प्रचंड वेगाने आणि वारंवार टीव्हीवर काठीने वार करू लागतो. हे पाहून आज तो रागाच्या भरात टीव्ही फोडूनच शांत बसेल असं वाटतं. मात्र असं काहीही होतं नाही.

हा व्यक्तीने काठीने टीव्हीवरती मारत असताना बराच वेळानंतर जे काही घडतं ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडिओमध्ये दिसतं की थोड्याच वेळात हा टीव्ही अगदी व्यवस्थितपणे सुरू होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंतीही मिळत आहे.

इन्स्टाग्रामवर beautifulteach या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा मजेदार व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे. जवळपास 6 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईकदेखील केलं आहे. असे अनेक भन्नाट व्हिडीओ हे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: man fix tv with stick indian jugaad funny video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.