Viral Video: पिसाळलेल्या हत्तीसमोर निधड्या छातीने उभा राहीला एकटा तरुण, गावकऱ्यांच्या रक्षणासाठी केली शर्थ अन् मग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 02:04 PM2022-02-20T14:04:12+5:302022-02-20T14:05:28+5:30
एका हत्तीचा (Elephant video) एका तरुणाने एकट्याने सामना केला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
जंगलाच्या जवळ राहणारे लोक नेहमीच जंगली प्राण्यांच्या दहशतीत असतात. हे प्राणी जंगलातून बाहेर शेतात किंवा रस्त्यांवर येतात. शेतीचं नुकसान करतात, माणसांना हानी पोहोचवतात. या माणसांनाही अशा प्राण्यांचा सामना करण्याची सवय झालेली असते. त्यामुळे बिनधास्तपणे ते अशा प्राण्यांच्या समोर जातात. अशाच एका हत्तीचा (Elephant video) एका तरुणाने एकट्याने सामना केला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
ओडिशाच्या रायराखोल वनविभागातील (Rairakhol Forest Divison Odisha) एक व्हिडीओ समोर आला आहे. एका शेतात एक अवाढव्य हत्ती घुसला. हत्तीला हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले. आधी त्यांनी एकत्र हत्तीला पळवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर हत्तीला घाबरून हळूहळू एकेएक करत सर्वांनी काढता पाय घेतला. सर्वजण हत्तीसमोरून दूर झाले. अखेर फक्त एक व्यक्ती या हत्तीसमोर उभी राहिली. (Man fight with elephant)
आपल्यासोबत असणारे इतर लोक मागे हटले हे समजल्यानंतरही ही व्यक्ती घाबरली नाही की तिने आपली जागा जोडली नाही, माघार घेतली नाही. तर उलट हत्तीच्या अगदी समोर उभं राहून, छाती ताणून त्याचा सामना केला. हातात मशाल धरून हत्तीला घाबरवण्याचा प्रयत्न केला.
या व्यक्तीचं नाव चितरंजन आहे. ते राजखोल वनविभागात वनरक्षक आहेत. हत्तीला शेतीचं नुकसान करण्यापासून रोखण्याचं काम त्यांनी केलं. हत्तीला गावापासून दूर जंगलात पळवून लावलं. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सर्वांनी या वनरक्षकाच्या धाडसाचं कौतुक केलं जातं आहे.
Salutation to this Forest Guard from Rairakhol Forest Divison, Odisha. Mr Chita Ranjana’s action is the epitome of hard work our field staff do in the face of adversity.
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 17, 2022
Stands his ground alone and chases the crop raiding tusker. pic.twitter.com/yY5CkOSUJk