खोदकाम करताना सापडला एक गोलाकार दगड, तोडला तर आत दिसला खजिना...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:37 AM2024-04-24T10:37:28+5:302024-04-24T10:38:15+5:30
viral video : यात तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती जमिनीत खोदकाम करत आहे आणि अचानक त्याला एक गोलाकार दगड सापडतो.
पूर्वीच्या काळात लोक त्यांच्याकडील पैसे, दागिने हे जमिनीमध्ये किंवा भींतीमध्ये लपून ठेवत होते जेणेकरून ते चोरी होऊ नये. अशात काही मातीच्या भांड्यांमध्ये किंवा धातुच्या जारमध्ये हे दागिने, नाणी ठेवली जात होते. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून एका व्यक्तीच्या हाती असाच एक जुना खजिना लागला आहे. तो जमिनीत खोदकाम करत होता. तेव्हा त्याला एक दगडासारखी वस्तू सापडली. जी उघडल्यावर तो अवाक् झाला.
असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मुद्दाम बनवलेले असतात. त्यात काही तथ्य नसतं. अशात हा व्हिडीओही खरा आहे की नाही याचा दावा आम्ही करत नाही. हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंट @felezyabie वर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. यात तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती जमिनीत खोदकाम करत आहे आणि अचानक त्याला एक गोलाकार दगड सापडतो. पण तो दगड नसून एक बॉक्स असतो. त्यात काही वस्तू आहेत. जेव्हा त्याने हा बॉक्स तोडला तेव्हा आतील वस्तू बघून तो थक्क झाला.
या गोलाकार बॉक्समध्ये त्याला काही धातुचे दागिने आणि इतर काही वस्तू सापडल्या. अर्थातच याची त्याला मोठी किंमत मिळेल. यात सोन्याची बांगडी, सोन्याची चेन आणि इतर काही वस्तू आहेत. पण ते खरंच सोन्याचे आहेत, खरे आहेत की नाही हे सांगता येत नाही.
पण तरीही या व्हिडीओला आतापर्यंत 19 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर यावर शेकडो लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिलं की, या व्यक्तीला इतका विश्वास कसा होता की, तो खजिना आहे बॉम्ह नाही. दुसऱ्याने लिहिलं की, हे दागिने नवे तर वाटत नाहीये. तिसऱ्याने लिहिलं की, हा व्हिडीओ खोटा आहे. तुम्हाला काय वाटतं व्हिडीओ खरा आहे की खोटा?