अरेरे! लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, कर्जावर घेतलेली रिक्षाही पालिका कर्मचाऱ्यांनी तोडली, अन् मग.....

By manali.bagul | Published: October 9, 2020 03:50 PM2020-10-09T15:50:37+5:302020-10-09T15:57:21+5:30

Viral News Marathi :हातावर पोट असलेल्या गरिबाची रिक्षाही हटवण्यात आली.  नोकरी गेल्यामुळे नुकतंच कर्ज  काढून ही रिक्षा त्यांनी विकत घेतली होती. 

Man gifts new rickshaw to rickshawala after his was seized by authorities news from bangldesh | अरेरे! लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, कर्जावर घेतलेली रिक्षाही पालिका कर्मचाऱ्यांनी तोडली, अन् मग.....

अरेरे! लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, कर्जावर घेतलेली रिक्षाही पालिका कर्मचाऱ्यांनी तोडली, अन् मग.....

Next

(Image credit- Indiatimes.com)

गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही 'बाबा का ढाबा' हा ट्रेंड पाहिलाच  असेल.  प्रतिकुल परिस्थितीत असल्यामुळे एका व्हिडीओत या आजोबांना रडू कोसळलं होतं आणि बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर नेटिझन्सच्या कमालीने असं काही झालं, ज्यानं या आजोबांचं नशीबचं पालटलं. या आजोबांच्या दुकानात खवय्यांची तुफान गर्दी झाली होती. अशीच एक बातमी आता बांग्लादेशमधून समोर येत आहे. इथं रस्त्यावरून बॅटरी रिक्षा हटवण्यात येत होत्या. त्यात फाजलूर रेहमान या हातवर पोट असलेल्या गरिबाची रिक्षाही हटवण्यात आली.  नोकरी गेल्यामुळे नुकतंच कर्ज  काढून ही रिक्षा त्यांनी विकत घेतली होती. 

साकिब रेहमान यांनी हा व्हिडीओ फेसबूकवर शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये तुम्ही पाहू शकता  रेहमान रडत रडत आपली व्यथा सांगत आहेत.  या व्हिडीओला आजचा सगळ्यात 'मोठा रिक्षावाला' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार  रेहमान आधी एका दुकानात काम करत होते. लॉकडाऊनमुळे नोकरी गेली नंतर रोजगारासाठी कर्ज काढून घेतलेली रिक्षाही पालिका कर्मचाऱ्यांनी उचलून नेली.

ही रिक्षा  घेण्यासाठी ८० हजार रुपयांचे कर्ज रेहमान यांनी  घेतले होते. रिक्षा उचलून नेल्यानंतर आपलं पोट कसं भरणार या विचाराने रेहमान  यांना रडू कोसळले. रेहमान यांचा रडतानाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा हात मिळाला आणि रेहमान  याच्या रडणाऱ्या चेहऱ्यावर फुललं हसू फुललं.

rahman ka rickshaw

एहसान भूयान या गृहस्थाने  रेहमान यांची दयनीय अवस्था पाहून मदत करायचं ठरवलं.  त्यानंतर त्यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि जर ठरवलं तर आपणं  गोष्टी बदलू शकतो असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. नवीन रिक्षा ऑर्डर करून घरी जातानाचा रेहमान  यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला नेटिझन्सचा तुफान प्रतिसाद दिला असून आतापर्यंत ३२ हजार शेअर्स या व्हिडीओला मिळाले आहेत.  तर २० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. ९ हजारापेक्षा जास्त लोकांनी  या व्हिडीओवर कमेंट केली असून रोजगार मिळवून देण्यासाठी मदत  करणार असल्याचे सांगितले आहे. 

Web Title: Man gifts new rickshaw to rickshawala after his was seized by authorities news from bangldesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.