समोर गर्लफ्रेंड अन् मागे खोल दरी.. प्रपोज करायला गेला आणि काय घडलं पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 07:56 PM2022-01-13T19:56:46+5:302022-01-13T19:57:05+5:30
गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घालण्याचा क्षण अविस्मरणीय ठरावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण एका कपलसाठी हा खास क्षण अविस्मरणीय तर ठरलाच आणि तितकाच काळजाचे ठोके वाढवणारा ठरला आहे.
गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घालण्याचा क्षण अविस्मरणीय ठरावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण एका कपलसाठी हा खास क्षण अविस्मरणीय तर ठरलाच आणि तितकाच काळजाचे ठोके वाढवणारा ठरला आहे. गर्लफ्रेंडला एखाद्या सुंदर धबधब्याजवळ फिरण्यासाठी घेऊन जावं आणि याच निसर्गरम्य ठिकाणी तिला लग्नाची मागणी घालावी असा जबरदस्त प्लान बॉयफ्रेंडनं केला होता. प्लाननुसार सारंकाही व्यवस्थित घडलं पण गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घालण्यासाठी त्यानं अंगठी खिशातून बाहेर काढली आणि तो तिच्यासमोर गुडघ्यावर खाली बसला. तितक्यातच तिच्यासाठी आणलेली अंगठी खोल दरीत पडली अन् सारा खेळ खल्लास झाला.
सोशल मीडियात सध्या याच घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. बॉयफ्रेंडनं आपल्या आयुष्यभराच्या साथीदाराला लग्नाची मागणी करण्यासाठीचा क्षण खास बनवण्यासाठी रोमँटिक प्लान केला होता. दूर डोंगरात उंच ठिकाणी तो गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन गेला. एक छान जागा पाहून त्यानं गर्लफ्रेंडसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यानं एक छान अंगठी देखील गर्लफ्रेंडला देण्यासाठी आणली होती. ती खिशातून बाहेर काढली आणि तो प्रपोज करण्यासाठी गुडघ्यांवर बसणार तितक्यात अंगठी खाली पडली. ती थेट खोल दरीत गेली आणि दोघांनाही मोठा धक्का बसला. आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा क्षण आणि त्यावर असं पाणी फेरलं गेल्याच्या घटनेवर काहीवेळ गर्लफ्रेंडलाही विश्वास बसत नव्हता.
पाहा व्हिडिओ-