VIDEO : तरूणाने बांबूपासून तयार केली इको फ्रेंडली सायकल, खर्च वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 01:39 PM2024-08-30T13:39:10+5:302024-08-30T14:05:38+5:30
Viral Video : अमरेश कुशवाह नावाच्या यूजरने इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात व्यक्ती बोलताना दिसत आहे. ही व्यक्ती बांबूपासून तयार सायकल चालवत आहे.
Viral Video : सायकल चालवणं आजही अनेकांना आवडतं. सायकलसाठी ना पेट्रोल लागत ना डिझेल. उलट सायकल चालवून शरीराला अनेक फायदे मिळतात. बाजारात आज अनेक हायटेक सायकली मिळतात. ज्यांची किंमतही भरपूर असते. सामान्य लोक या सायकली घेऊही शकत नाहीत. अशात बिहारच्या एका तरूणाने जुगाड करून कमी खर्चात एक जबरदस्त सायकल तयार केली आहे.
अमरेश कुशवाह नावाच्या यूजरने इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात व्यक्ती बोलताना दिसत आहे. ही व्यक्ती बांबूपासून तयार सायकल चालवत आहे. इन्स्टाग्राम हॅंडलनुसार, समस्तीपूरमध्ये राहणाऱ्या या तरूणाने बांबूपासून इको फ्रेंडली सायकल तयार केली आहे. बांबूच्या या सायकलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडिओला ६८ हजार लोकांनी लाईक केलं आहे. तसेच लोकांनी या तरूणाचं कौतुकही केलं आहे.
या तरूणाची अडचण ही होती की, तो स्वस्तातील स्वस्त सायकल खरेदी करू शकत नव्हता. अशात त्यानेच आयडियाची कल्पना लावत ही सायकल तयार केली. महत्वाची बाब म्हणजे ही सायकल बनवण्यासाठी त्याला केवळ ५०० रूपये खर्च आला. तरूणाने ही सायकल केवळ २५ दिवसांमध्ये तयार केली. ही सायकल चालवून तो आता त्याची रोजची कामे करत आहे.