....अन् Mc Donald's च्या बर्गरपासून 'त्याने' बनवलं चक्क आईस्क्रिम; भन्नाट Video सोशल मीडियावर सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 10:10 AM2021-02-17T10:10:15+5:302021-02-17T10:14:50+5:30

Mc Donald's Burger And Icecream Video : भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

man made icecream from mc donalds chicken burger funny memes goes viral on social media | ....अन् Mc Donald's च्या बर्गरपासून 'त्याने' बनवलं चक्क आईस्क्रिम; भन्नाट Video सोशल मीडियावर सुपरहिट

....अन् Mc Donald's च्या बर्गरपासून 'त्याने' बनवलं चक्क आईस्क्रिम; भन्नाट Video सोशल मीडियावर सुपरहिट

Next

सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड्स येत असतात. अनेक गोष्टी या सातत्याने व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. आईस्क्रिम हे सर्वांच्याच आवडीचं. आपण ते नेहमीचं खातो. पण तुम्हाला जर कोणी चिकन बर्गरपासून आईस्क्रिम तयार केल्याचं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मॅकडोनाल्ड्चं (Mc Donald's) Chicken Burger आणि आईस्क्रिम (Icecream) या दोन्ही गोष्टी अनेकांनी प्रचंड आवडतात. 

पाकिस्तानातील एका व्यक्तीने मॅकडोनाल्ड्चा चिकन आणि आईस्क्रिम दोन्ही पदार्थांना एकत्र आणत भन्नाट क्रिएटिव्हिटी दाखवली आहे. हे पाहून लोक अक्षरश: चकीत झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर मॅकडोनाल्ड् चिकन बर्गर बनवणंच बंद करून टाकेल असं देखील काहींनी म्हटलं आहे. एका पाकिस्तानी व्यक्तीने चिकन बर्गरपासून आईस्क्रिम तयार केलं आहे. अल्पावधीच सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून हिट ठरला आहे. या चिकन बर्गरपासून तयार केलेल्या या हटके आईस्क्रिमची चव नेमकी कशी असेल असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. 

आईस्क्रिमच्या या अजब प्रकारावरून आणि व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर मजेदार मीम्स (memes) आणि जोक्ससुद्धा शेअर करण्यात येत आहेत. @darshanpathak नावाच्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. "हे पाहून मॅकडोनाल्ड्स नेहमीसाठी चिकन मॅक बंद करून टाकेल" असं कॅप्शनसुद्धा व्हिडिओसोबत त्याने लिहिलं आहे. व्हिडीओमध्ये तो व्यक्ती सुरुवातीला मॅकडोनाल्ड्सच्या बॉक्समधून चिकन मॅक बाहेर  काढते आणि मग तिचे बारीक-बारीक तुकडे करते. यानंतर तो त्यात दूध आणि क्रीम मिसळतो आणि आईस्क्रीम तयार करतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"Sorry Love, मी तुझं जेवण खाल्लं", Uber Eats च्या डिलिव्हरी बॉयने स्वत:च संपवली ऑर्डर अन्...

ऑनलाईन फूड ऑर्डर करण्याकडे अनेकांचा सध्या अधिक कल असतो. एकदा जेवण ऑर्डर केल्यानंतर ते कधी घरी येतं असंच अनेकांना वाटतं असतं. मोबाईलमध्ये अनेकदा आपण त्याचं लोकेशन देखील पाहत असतो. मात्र तुम्हाला खूप भूक लागलेली असताना जर ऑर्डरचं घरी आली नाही अथवा ऐन वेळी ऑर्डर कॅन्सल केली तर प्रचंड संताप होतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. लंडनमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयने जेवणाची ऑर्डरच संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. लंडनमधील इली इलियास या 21 वर्षीय तरुणीने जेवणाची ऑर्डर केली होती. तिने बर्गर, चिप्स, आणि चिकन रॅपर अशी साधारण 20 डॉलर म्हणजेच साधारण 1456 रुपयांची ऑर्डर केली होती. तिने उबर इट्समधून (Uber Eats) ही ऑर्डर केली होती. मात्र बराच वेळ झाला तरी तरुणीची ऑर्डर काही आली नाही. काही वेळानंतर तिला एक मेसेज आला. तो पाहून तर तिला धक्काच बसला. "सॉरी love, मी तुझं जेवण खाल्लं" असा मेसेज डिलिव्हरी बॉयने केला होता. 

Web Title: man made icecream from mc donalds chicken burger funny memes goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.