बाबो! या पठ्ठ्यानं बाईकचा जुगाड करून बनवलं 'JCB मशीन'; अन् आनंद महिंद्रा म्हणाले......

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 06:08 PM2021-02-17T18:08:56+5:302021-02-17T18:13:19+5:30

Anand mahindra said indians not only champions of jugaad : उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर नेहमीच एक्टीव्ह असतात.

Man made jcb machine from a bike with jugaad anand mahindra said indians not only champions of jugaad | बाबो! या पठ्ठ्यानं बाईकचा जुगाड करून बनवलं 'JCB मशीन'; अन् आनंद महिंद्रा म्हणाले......

बाबो! या पठ्ठ्यानं बाईकचा जुगाड करून बनवलं 'JCB मशीन'; अन् आनंद महिंद्रा म्हणाले......

Next

सोशल मीडियावर भारतीयांच्या जुगाडाचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. आपली गैरसौय टाळण्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. असेच जुगाड अनेकदा व्हायरल होत असतात. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra)  सोशल मीडियावर नेहमीच एक्टीव्ह असतात.

 

नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते गमतीदार व्हिडीओज शेअर करतात. सध्या आनंद महिंद्रांनी केलेले ट्विट तुफान व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी एका अमेरिकन नागरिकाचा फोटो पोस्ट केला आहे. आपल्या  देशाचं जुगाडूंचे शीर्षक कोणीतरी हिसकावून घेतल्याचं त्यांचे म्हणणं आहे. कारण  जुगाडाच्या बाबतीत भारतीयांना कोणीही हरवू शकत नाही. असं त्याचं मत आहे. 

आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोसह त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'अमेरिकेच्या एका मित्राने हा फोटो पाठविला आहे. आमचा 'जुगाड' चॅम्पियन धोक्यात आहे. महिंद्रा लोडर एका बाईकमध्ये जोडला गेला आहे जो पाहणे फारच मनोरंजक आहे.' Cute baby cow video: 'त्या'ने घरातच पाळली बुटकी गाय, दिवसाला देते ५ लीटर दूध, दिसायला आहे इतकी सुंदर की...

लोकांना हा फोटो खूप आवडला असून त्यांनी या फोटोवर गमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत ३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या फोटोला मिळाले आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले- 'काळजी करू नका सर, आम्ही या तंत्रज्ञानामध्ये सर्वात पुढे असू'. दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले- 'महिंद्राआहे, तर शक्य आहे'. त्याच वेळी आणखी एका वापरकर्त्याने लिहिले - 'आता मुल कोडिंग नाही तर जुगाड शिकतील असं म्हणलं आहे.'  या फोटोतील हातांची संख्या आहे तरी किती? पाहताच क्षणी लोक गोंधळात पडले, बघा तुम्हाला जमतंय का

Web Title: Man made jcb machine from a bike with jugaad anand mahindra said indians not only champions of jugaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.