Video - "2 कोटींची हवेली, 25 लाखांची FD अन्..."; लेकीच्या लग्नासाठी वडिलांची मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:09 AM2024-04-02T11:09:58+5:302024-04-02T11:41:22+5:30

मुलीचे वडील आपल्या लेकीच्या लग्नासाठी योग्य मुलाच्या शोधात आहेत. जो मुलगा या मुलीशी लग्न करेल त्याला कोट्यवधीची संपत्ती मिळणार असल्याचं म्हटलं आहे.

man offering his property to person who will marry his daughter video goes viral internet reacts | Video - "2 कोटींची हवेली, 25 लाखांची FD अन्..."; लेकीच्या लग्नासाठी वडिलांची मोठी ऑफर

Video - "2 कोटींची हवेली, 25 लाखांची FD अन्..."; लेकीच्या लग्नासाठी वडिलांची मोठी ऑफर

लग्नासाठी योग्य वधू किंवा वराचा शोध घेतला जातो. मात्र, त्यांना योग्य वधू-वर न मिळाल्यास कुटुंबीयही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुलीचे वडील आपल्या लेकीच्या लग्नासाठी योग्य मुलाच्या शोधात आहेत. 

जो मुलगा या मुलीशी लग्न करेल त्याला कोट्यवधीची संपत्ती मिळणार असल्याचं म्हटलं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुलीचे वडील म्हणतात, "जो कोणी माझ्या मुलीशी लग्न करेल, मी माझी दोन कोटींची हवेली, माझं क्लिनिक आणि 25 लाखांची एफडी त्याच्या नावावर करीन." त्याचवेळी मुलगी म्हणते की, "मुलगा गोरा असेल किंवा लहान असेल याची मला पर्वा नाही. फक्त मला आणि माझ्या मुलीला आनंदी ठेवायला हवं" 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ shadi_karne_wali_girls नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 3 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. असा व्हिडीओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील असे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं की, हवेलीत भूत आहे, तर दुसऱ्या युजरने लिहिलं की मागणी घालण्यासाठी नेमकं कधी येऊ? त्याचवेळी आणखी एका युजरने हे फ्रॉड असून पब्लिसिटी असल्याचं देखील सांगितलं आहे. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. 
 

Web Title: man offering his property to person who will marry his daughter video goes viral internet reacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.