जंगलात लागलेल्या आगीत होरपळलेल्या Koala ला नवं जीवनदान, बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 01:25 PM2019-11-16T13:25:56+5:302019-11-16T13:30:05+5:30

ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये काही दिवसांपूर्वी वणवा पेटला होता. त्यात कितीतरी जनावरे जळून राख झालीत.

Man offers water to injured koala and rescued him to hospital | जंगलात लागलेल्या आगीत होरपळलेल्या Koala ला नवं जीवनदान, बघा व्हिडीओ

जंगलात लागलेल्या आगीत होरपळलेल्या Koala ला नवं जीवनदान, बघा व्हिडीओ

Next

ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये काही दिवसांपूर्वी वणवा पेटला होता. त्यात कितीतरी जनावरे जळून राख झालीत. अशातच Koala Bear चा व्हिडीओ समोर आला आहे. हा भालू पूर्णपणे भाजला गेलाय. एका व्यक्तीने त्याला आधी पाणी पाजले आणि नंतर त्याच्यावर उपचार केलेत. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ Koala Hospital हे Port Macquarie मध्ये आहे. त्यांच्या फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ज्या व्यक्तीने bear ला पाणी पाजले, ती व्यक्तीच त्याला हॉस्पिटलमधे घेऊन गेली. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. पण त्याचं नाक फार जास्त भाजलं गेलंय. 

Koala ही अस्वलांची एक दुर्मिळ प्रजाती आहे. ही प्रजाती खासकरून ऑस्ट्रेलियामधे आढळते. Lake Innes Nature Reserve मधे ३५० पेक्षा Koala होते. आता ते सर्व तिथे नाहीत. जंगलात लागलेल्या आगीत काही जळून मेले तर काहींवर उपचार सुरू आहेत. 

Christeen आणि Paul McLeod ने मिळून Koala चा जीव वाचवला आहे. त्यांनी त्यांच्या घरालाच हॉस्पिटल केलंय. 


Web Title: Man offers water to injured koala and rescued him to hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.