VIDEO: फिरत्या मशीनमध्ये टाकली अख्खी बाइक, काही मिनिटांमध्ये झाला चेंदामेंदा...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 04:22 PM2022-04-16T16:22:36+5:302022-04-16T16:24:27+5:30
Viral Video : टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि डिझाइनसंबंधी भन्ना व्हिडीओ प्रमोट करणारं इन्स्टाग्राम अकाऊंट टेकएक्सप्रेसने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ यूजर्सना खूपच आवडला आहे.
Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अजब व्हिडीओ व्हायरल होत असतात. इथे तुम्हाला अनेक असे व्हिडीओ दिसतील जे हैराण करतात आणि आपलं मनोरंजनही करतात. सोशल मीडियावर एका फॅक्टरीतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून हैराणही व्हाल आणि तुमचं मनोरंजनही होईल.
टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि डिझाइनसंबंधी भन्ना व्हिडीओ प्रमोट करणारं इन्स्टाग्राम अकाऊंट टेकएक्सप्रेसने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ यूजर्सना खूपच आवडला आहे. काही व्हिडीओ काही बनवलं नाही तर तोडलं जात आहे. जे फारच आश्चर्यचकित करणारं आहे. व्हिडीओत एका बाईकचे तुकडे-तुकडे केले जात आहे.
श्रेडर ही एक प्रकारची मशीन आहे ज्यात सामान्यपणे भंगारातील वस्तुंचे तुकडे केले जातात. जेणेकरून या वस्तूंचे तुकडे करून ते पर्यावरणात डिस्पोज केले जातील किंवा त्या तुकड्यांपासून काही दुसरं बनवता येईल. श्रेडरमध्ये जेही काही टाकाल ते पूर्णपणे नष्ट होतं आणि त्या वस्तुंचा चेंदामेंदा होतो. असंच काहीसं एका बाइकसोबत झालं.
एका व्यक्तीने एक बाइक श्रेडरमध्ये टाकली. बाइक जुनी आहे आणि तिचे तुकडे करण्यासाठी तिला श्रेडरमध्ये टाकलं जात आहे. त्यानंतर जे होतं ते बघण्यासारखं आहे. काही मिनिटांमध्ये इतक्या मोठ्या बाइकचा चुराडा होतो.
गाडीचे रिंग, टाकी, हॅंड सगळंकाही बारीक होतं. या व्हिडीओला आतापर्यंत २४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४८ हजारांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. लोक श्रेडरची शक्ती पाहून हैराण झाले आहेत.