'अच्छा तो हम चलतें हैं'... डबल डेकर सायकलवर आजोबांचे हेवी रायडिंग, video पाहून नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 01:06 PM2023-11-26T13:06:39+5:302023-11-26T13:07:49+5:30
मुंबईसारख्या शहरात किंवा इतर ठिकाणी तुम्ही डबल डेकर बस पाहिली असेलच. अनेकांनी या डबल डेकर बसमधून प्रवासदेखील केला असेल.पण तुम्ही कधी डबल डेकर सायकल पाहिलीय का?
Viral Video : सध्याचे जग हे इंटरनेटवर आधारलेले आहे. या आभासी जगात सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वयस्क माणूस चक्क डबल डेकर सायकल चालवताना दिसत आहेत. आजोबांचा अनोखा जुगाड पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही डबल डेकर सायकल नेमकी कशी तयार करण्यात आली, असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडलाय. सामान्य सायकलपेक्षा ही सायकल उंच असूनही आजोबा अगदी सहजतेने सायकल चालवताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, तरीसुद्धा आजोबांचा हा जुगाड अनेकांच्या पसंतीस देखील उतरला आहे.
नेटकरी काय म्हणाले...
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडियोवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना ही सायकल बनवण्याची ट्रीक जाणून घेण्याची उत्सुकता आहे. या सायकलमध्ये अॅटलसची फ्रेम कापून ती सामान्य सायकलला जोडण्यात आली आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ' हे काका या सायकलवर कसे चढले असतील? रस्त्यावरही ते कोणाच्या आधाराशिवाय चढू शकत नाहीत..', तर दुसऱ्या यूजरने म्हटलंय की , ' बाकी सर्व ठीक आहे, पण आता ते सायकलवरून खाली कसे उतरतील?
येथे पाहा व्हिडिओ:
कैप्शन..?
— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) May 30, 2023
☺️ pic.twitter.com/GwZyW4Crkf