माणुसकी जिंदाबाद! रेल्वे यायला शिल्लक होती फक्त १० सेकंद, इतक्यात अपंग पडला रेल्वे ट्रॅकवर, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 06:45 PM2021-08-05T18:45:15+5:302021-08-05T18:45:51+5:30

काही माणसं तर स्वत:च्या जीवाची बाजी लावून लोकांचा जीव वाचवतात. अशा व्यक्तींचे कौतुक करावे तेवढे थोडेच. या व्हिडिओतल्या व्यक्तीबाबतही तुम्ही असेच म्हणाल...

man saved wheelchair handicap from death, he fell on railway track and train was arriving in 10 seconds | माणुसकी जिंदाबाद! रेल्वे यायला शिल्लक होती फक्त १० सेकंद, इतक्यात अपंग पडला रेल्वे ट्रॅकवर, मग...

माणुसकी जिंदाबाद! रेल्वे यायला शिल्लक होती फक्त १० सेकंद, इतक्यात अपंग पडला रेल्वे ट्रॅकवर, मग...

Next

काही प्रसंग असे असतात की त्यावेळी मनाला वाटत माणूसकी जिंदाबाद! संकटकाळी माणूस जेव्हा माणसाच्या मदतीला धावून येतो तेव्हा माणूसकी अजूनही जिवंत आहे असे वाटते. काही माणसं तर स्वत:च्या जीवाची बाजी लावून लोकांचा जीव वाचवतात. अशा व्यक्तींचे कौतुक करावे तेवढे थोडेच. या व्हिडिओतल्या व्यक्तीबाबतही तुम्ही असेच म्हणाल...

या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की एक अपंग माणूस त्याच्या व्हिलचेअर सह रेल्वेट्रॅकवर पडला आहे. ट्रेन यायला फक्त १० सेकंद आहेत. इतक्यात एक व्यक्ती उडी मारतो अन् त्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूला लोक जमा होतात. त्यातील एकाकडे तो त्याची व्हिलचेअर देतो अन् त्या माणसाला उचलून रेल्वे प्लॅटफॉर्मवर येतो.

माणूसकीचं दर्शन घडवणारा हा व्हिडिओ अपलोड केल्या केल्या क्षणार्धात व्हायरल झाला. या व्हिडिओला केवळ १५ तासात ३८ हजारापेक्षाही जास्त व्हिव्ज मिळाले आहेत अनेकजण यावर कमेंट करत आहेत. यात ते या व्यक्तीचं खुप कौतुक करत आहेत. तर काहीजण माणूसकीवरचा विश्वास पक्का झाल्याचं म्हणत आहेत.

Web Title: man saved wheelchair handicap from death, he fell on railway track and train was arriving in 10 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.