'बँक बॅलन्स एका रात्रीत झाला खर्च', रेस्टॉरंटचे बिल पाहून व्यक्तीला धक्काच बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 10:34 PM2021-09-28T22:34:07+5:302021-09-28T22:34:59+5:30
restaurant bill : या व्यक्तीचे बिल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि युजर्स त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
एका व्यक्तीला रेस्टॉरंटमध्ये जेवण करणे महागात पडले. रेस्टॉरंटचे बिल पाहून त्याला धक्काच बसला. या व्यक्तीने हे बिल ट्विटरवर शेअर केले आहे. त्यानुसार, रेस्टॉरंटमधील जेवण इतके महाग होते की, त्याचा संपूर्ण बँक बॅलन्स एका रात्रीत खर्च झाला. दरम्यान, या व्यक्तीचे बिल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि युजर्स त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. (man shocked after seeing restaurant bill said bank balance spent in one night share hotel bill on twitter)
'डेली मेल'मधील एका वृत्तानुसार, जमील अमीन नावाचा एक व्यक्ती लंडनच्या सॉल्ट बे (Salt Bae) येथील रेस्टॉरंटमध्ये (Nusr-Et Steakhouse) रात्री जेवणासाठी गेला होता. परंतु जेवणानंतर त्याला येथे देण्यात आलेल्या बिल पाहिल्यानंतर धक्काच बसला. रेस्टॉरंटमध्ये जमील याला एक लाख 82 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे बिल देण्यात आले.
या बिलामध्ये यामध्ये केवळ एका पदार्थाची किंमत 63 हजार रुपयांपेक्षा जास्त होती. चार रेड बुल्सची किंमत सुद्धा जास्त लावण्यात आली होती. एवढेच नाही तर 23,831 रुपये सेवा शुल्क देखील आकारले होते. दरम्यान, हे सर्व इतर ठिकाणी स्वस्त दरात मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता.
जमीलने रेस्टॉरंटचे बिल सोशल मीडियावर शेअर केले. सोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - 'चार रेड बुल्ससाठी 44 ब्रिटिश पाउंड ... हसू येत आहे.' तो पुढे म्हणाला की 'माझा संपूर्ण बँक बॅलन्स एका रात्रीत खर्च केला!' दरम्यान, हे प्रकरण जुने आहे, पण आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ट्विटरवर बिलच्या पोस्टला जवळपास 10,000 लाईक्स मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत. रेस्टॉरंटच्या इतक्या जास्त किंमतींमुळे युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. एका युजर्सने म्हटले आहे की, जेवणात गोल्डन बर्गर दिले होते का? तो जगातील सर्वोत्तम बर्गर होता का?