ये क्या है रे बावा! तुम्हालाही पनीर आवडतं का? व्हायरल फोटो पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 11:45 AM2023-10-31T11:45:07+5:302023-10-31T11:46:22+5:30

Paneer Viral Photo : हा फोटो पाहून लोक हैराण झाले आहेत. त्यांचं मत आहे की, पनीर तयार करताना स्वच्छतेची अजिबात काळजी घेतली जात नाही.

Man sitting on paneer photo viral on social media people react on hygiene UP Kanpur | ये क्या है रे बावा! तुम्हालाही पनीर आवडतं का? व्हायरल फोटो पाहून व्हाल हैराण

ये क्या है रे बावा! तुम्हालाही पनीर आवडतं का? व्हायरल फोटो पाहून व्हाल हैराण

Paneer Viral Photo : सोशल मीडियावर नेहमीच अजब अजब फोटो व्हायरल होत असतात. काही विचारात पाडणारे तर काही डोकं चक्रावून सोडणारे असतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती पनीरवर बसलेला दिसत आहे. हा फोटो उत्सवांच्या दिवसात नेहमीच व्हायरल होत असतो. हा फोटो पाहिल्यावर पनीर खाण्याचं मन होणार नाही. 

अनेकजण पनीर आवडीने खातात. काही लोक भाजी खातात तर काही लोक याची भजीही खातात. मिठाई बनवण्यासाठीही याचा वापर केला जातो. पण हा फोटो पाहून लोक हैराण झाले आहेत. त्यांचं मत आहे की, पनीर तयार करताना स्वच्छतेची अजिबात काळजी घेतली जात नाही.

हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @zhr_jafri नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगितलं जात आहे. फोटोत तुम्ही पनीर बनवणाऱ्या व्यक्तीला बघू शकता. तो लुंगीवर पनीरमधील जास्तीचं पाणी काढण्यासाठी पनीरवर बसला आहे. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. 

लोक या फोटोवर कमेंटमध्ये म्हणाले की, 'घरीच छोट्या परीवारासाठी पनीर तयार करणं सोपं काम आहे'. त्यावर एका दुसऱ्या यूजरने कमेंट केली की, 'घरीच तयार करत जा भाऊ, ते बरं पडेल'. तिसऱ्या यूजरने गंमीतने कमेंट केली की, 'नशीब त्याने मधे लाकडाची पाटी ठेवली आहे'. चौथ्याने लिहिलं की, 'तुम्ही या व्यक्तीचे आभार मानले पाहिजे की, त्याने पनीर आणि त्याच्या मधे काहीतरी ठेवलं आहे'. हा फोटो यूपीच्या कानपूरमधील असल्याचं सांगितलं जात आहे. 

Web Title: Man sitting on paneer photo viral on social media people react on hygiene UP Kanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.