Man slapped inspector : मास्क नव्हता म्हणून पकडला गेला; भर रस्त्यात पोलिसाला कानाखाली मारून फरार, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 04:24 PM2021-04-21T16:24:56+5:302021-04-21T16:32:18+5:30

Man slapped inspector : मुलगा अचानक त्यांच्यावर हात उचलून तेथून पळून जातो. हे पाहून त्याच्या शेजारी उभे असलेला एक पोलिस कर्मचारी त्याला पकण्यासाठी धावतात पण तो पळून गेल्यामुळे पोलिसांच्या हाती येत नाही. 

Man slapped inspector : Young man slapped sub inspector and ran away in kushinagar | Man slapped inspector : मास्क नव्हता म्हणून पकडला गेला; भर रस्त्यात पोलिसाला कानाखाली मारून फरार, पाहा व्हिडीओ

Man slapped inspector : मास्क नव्हता म्हणून पकडला गेला; भर रस्त्यात पोलिसाला कानाखाली मारून फरार, पाहा व्हिडीओ

Next

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा कहर केलेला पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. अशा स्थितीत  भयंकर कोरोना संक्रमणापासून बचाव होण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पाऊलं उचलण्यात येत आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन लोकांकडून केलं जात आहे की नाही, यावर लक्ष देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी कंबर कसली आहे. पण पोलिसांना अपशब्द वापरल्याच्या, नियम मोडल्याच्या अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशीच एक घटना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. 

फाझीलनगर पोलिस स्थानक प्रभारी दिग्विजय सिंह हे त्यांच्या सरकारी गाडीत बसलेले दिसत आहेत. त्यावेळी गाडीत बसून मास्क न घालणार्‍या एका तरूणास ते ओरडत आहे. थोड्या वेळाने, मुलगा अचानक त्यांच्यावर हात उचलून तेथून पळून जातो. हे पाहून त्याच्या शेजारी उभे असलेला एक पोलिस कर्मचारी त्याला पकण्यासाठी धावतात पण तो पळून गेल्यामुळे पोलिसांच्या हाती येत नाही. स्विमिंग पूलमध्ये अनोखळी मुलीशी बोलायला गेला; पत्नीनं पाहताचं केलं असं काही, पाहा व्हिडीओ

या संदर्भात पोलिस अधिकारी सुनील कुमार सिंह म्हणाले की, ''पोलिस या घटनेबाबत अत्यंत गंभीर आहेत.आरोपी मुलाविरूद्ध गुन्हा नोंदवून कठोर कारवाई केली जाईल.'' पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून दुचाकीची कागदपत्रेही मिळाली नाहीत. याप्रकरणी आरोपी रवी अग्रघरी, मोहन मोडनवाल आणि धीरेंद्र गोस्वामी, रा. गायघाट  यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. हजार रूपये भरूनही मास्क लावायला विसरला; अन् दुसऱ्या दिवशी भरला १० हजारांचा दंड

रेल्वे स्थानकावर तरूणीचा पोलिसांना शिवीगाळ

रेल्वे स्थानकावर एक पोलिस कर्मचारी महिलेला प्रवासी महिला शिवीगाळ करताना दिसून येत आहे. यावेळी एक महिला पोलिस कर्मचारी प्रवासी महिलेला कोरोना टेस्ट करण्याबाबत सांगत असताना या महिलेनं या पोलिसांना उलट उत्तरं द्यायला सुरूवात केली. सुरूवातीला ती फोनवरून या पोलिसाची तक्रार करण्याचा प्रयत्न करत म्हणते मला चाचणी करायची नाही. तरीही नियमांप्रमाणे जबरदस्ती या महिलेची चाचणी करण्यात येते. त्यानंतर पोलिस कर्मचारी आणि प्रवासी महिला यांची चांगलीच भांडणं होतात.जवळपास १ तास पोलिस या महिलेला समजावतात पण ती कोणाचचं ऐकायला तयार नसते. भोपाळ एक्सप्रेसनं ही तरूणी एका लग्नासाठी जोधपूरला आली होती. 

दरम्यान राज्य सरकारनं इतर राज्यातून येत असलेल्या प्रवाश्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केल्यामुळे तिला स्थानकावर कोरोनाच्या रिपोर्टबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी माझ्याकडे कोणताही रिपोर्ट नसल्याच ती म्हणाली. त्यानंतर रेल्वे स्थाकातील अधिकाऱ्यांनी तिला सॅम्पल देण्याची मागणी केल्यानंतर हा गोंधळ सुरू झाला. पोलिसांनी नीट समजावून सांगितल्यानंतरही या महिलेनं ऐकले नाही . त्यामुळे या महिलेवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Man slapped inspector : Young man slapped sub inspector and ran away in kushinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.