धक्कादायक! चालत्या कारमधून बाहेर आला अन् टपावर जाऊन उभा राहिला, स्टंटचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 13:46 IST2024-05-30T13:45:29+5:302024-05-30T13:46:09+5:30
या धक्कादायक व्हिडीओत ही व्यक्ती कशाचाही विचार न करता चालत्या कारमधन बाहेर येतो आणि कारच्या टपावर जाऊन उभा पाहतो.

धक्कादायक! चालत्या कारमधून बाहेर आला अन् टपावर जाऊन उभा राहिला, स्टंटचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आणि व्हिडीओंना लाइक्स मिळवण्यासाठी आजकाल लोक काहीही करायला लागले आहेत. या गोष्टी करत असताना त्यांना जीव जाण्याचीही भिती वाटत नाही. इतरांच्या जीवालाही त्यांच्यामुळे धोका होऊ शकतो. कुणी डोंगरावर जाऊन दरीजवळ स्टंट करतात, कुणी रेल्वेच्या दारात तर कुणी बाईकने वा कारने स्टंट करतात. असाच एक व्हिडीओ मुंबईतून समोर आला आहे.
मुंबईतील एका फ्लायओव्हरवरील हा व्हिडीओ आहे. यात एक तरूण चालत कारमधून बाहेर येतो आणि स्टेअरिंग सोडून कारच्या छतावर जाऊन उभा राहतो. या कारवर राजस्थानची नंबर प्लेट आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक त्यांवर टिका करत आहेत.
Iska part - 2 police upload karegi 😁 pic.twitter.com/gvnXw1PEOw
— Siya (@Siya17082000) May 28, 2024
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अधिकाऱ्यांचं यावर लक्ष गेलं. या धक्कादायक व्हिडीओत ही व्यक्ती कशाचाही विचार न करता चालत्या कारमधन बाहेर येतो आणि कारच्या टपावर जाऊन उभा पाहतो.
मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी एक्स म्हणजे आधीच्या ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे आणि चौकशी करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांना टॅक केलं आहे. दुसरीकडे लोकही यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, या व्यक्तीचं लायसेन्स रद्द करा. दुसऱ्याने लिहिलं की, यावर लगेच कारवाई केली नाही तर तो लोकांचा जीवही घेऊ शकतो.
पुण्यातील कार अपघाताच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच कल्याणमध्ये अल्पवयीन बीएमडब्ल्यू चालवत असताना आणि दुसरी व्यक्ती कारच्या बोनेटवर स्टंट करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी स्टंट करणाऱ्या व्यक्तीला लगेच अटक आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलाविरोधात कारवाई केली आहे.