चित्त्यासोबत या माणसाने असा काही सेल्फी घेतला जसा माकडासोबतच फोटो काढतोय अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 07:48 PM2021-12-17T19:48:27+5:302021-12-17T19:52:56+5:30

वाघ, बिबट्या, सिंह, चिता असे प्राणी आपल्याला जंगल सफारी, नॅशनल पार्क, प्राणीसंग्रहायलयात पाहायला मिळतात. त्यामुळे ते समोर दिसताच त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण अशा प्राण्यांसोबत सेल्फी घेण्याची कुणी हिंमत करेल का? पण या व्यक्तीने ती केली. अगदी माकडासमोर उभं राहून सेल्फी घ्यावा तसं त्याने या चित्त्यासोबत सेल्फी घेतला. व्हिडीओ पाहून अंगावर काटाच येईल.

man take selfie with cheetah video goes viral on social media | चित्त्यासोबत या माणसाने असा काही सेल्फी घेतला जसा माकडासोबतच फोटो काढतोय अन् मग...

चित्त्यासोबत या माणसाने असा काही सेल्फी घेतला जसा माकडासोबतच फोटो काढतोय अन् मग...

Next

फोटो आणि सेल्फी  (Selfie video) काढायला कुणाला आवडत नाही. एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो की सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. एका व्यक्तीनेही असाच सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याचा सेल्फी पाहाल तर हा जगातला सर्वात खतरनाक सेल्फी आहे, असंच तुम्हीही म्हणाल. कारण या व्यक्तीने चक्क एका बिबट्यासोबत (leopard video)  सेल्फी (Selfie with leopard video) घेतला आहे.

वाघ, बिबट्या, सिंह, चिता असे प्राणी आपल्याला जंगल सफारी, नॅशनल पार्क, प्राणीसंग्रहायलयात पाहायला मिळतात. त्यामुळे ते समोर दिसताच त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण अशा प्राण्यांसोबत सेल्फी घेण्याची कुणी हिंमत करेल का? पण या व्यक्तीने ती केली. अगदी माकडासमोर उभं राहून सेल्फी घ्यावा तसं त्याने या चित्त्यासोबत सेल्फी घेतला. व्हिडीओ पाहून अंगावर काटाच येईल.

व्हिडीओत पाहू शकता काही लोक जीपमधून जंगल सफारी कऱण्यासाठी आले आहेत. त्यावेळी त्यांना एक चित्ता दिसतो. चित्ता दिसताच आपल्या हातातील कॅमेरा घेऊन ते त्याचा व्हिडीओ बनवू लागतात, फोटो काढतात. इतक्यात तो चित्ता त्या जीपजवळ येतो. फक्त जीपजवळ येत नाही तर जीपच्या आत घुसतो.

चित्ता जीपमध्ये घुसून वरच्या बाजूने बसून राहतो. त्याला पाहून जीपमध्ये बसलेल्या सर्वांनाच घाम फुटतो. फोटो आणि व्हिडीओ कसले सर्वजण आपला जीव मुठीत धरून बसलेले असतात. पण एक व्यक्ती मात्र त्या चित्त्याच्या समोर येते. आपला मोबाईल हातात घेऊन उभी राहते. त्या व्यक्तीच्या मागे चित्ता असतो. चित्त्यासोबत ती व्यक्ती सेल्फी घेताना दिसते. या व्यक्तीचा व्हिडीओ बनवणारी व्यक्ती आपला कॅमेरा जीपमधील इतर व्यक्तींच्या दिशेने फिरवते, तेव्हा पाहू शकता ही जीपमधील सर्वांची अवस्था कशी झाली आहे.

प्रकाश अगरवाल नावाच्या फेसबुक युझरने आपल्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहून या तरुणाच्या डेअरिंगला बहुतेकांनी दाद दिली आहे. कुणी त्याला शेरदिल म्हटलं तर कुणी जिगरबाज. सेल्फी असावा तर असा अशी प्रतिक्रियाही काही युझर्सनी दिली आहे.

Web Title: man take selfie with cheetah video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.