कर्मा इज बॅक... गाडी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला अशी मिळाली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 02:55 PM2019-10-17T14:55:55+5:302019-10-29T15:07:37+5:30
वाईट कामांचा परिणाम वाईटच असतो. अनेकदा आपण ऐकतो की, आपण जे करतो त्याची फळं येथेच मिळतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाईट कामांचा परिणाम वाईटच असतो. अनेकदा आपण ऐकतो की, आपण जे करतो त्याची फळं येथेच मिळतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीच्या वाईट कामाचं फळ त्याला त्याच ठिकाणी मिळालं.
एक चोर गाडी चोरण्याचा प्रयत्न करत होता. गाडीची काच फोडून चोर गाडी पळवण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी तो गाडीच्या काचेवर वीट टाकतो. पण ती वीट त्याच्याच चेहऱ्यावर जाऊन लागते. ती वीट चोराच्या चेहऱ्यावर एवढ्या जोरात लागते की, त्याला होणाऱ्या वेदनांनी तो अगदी हैराण होतो.
'द सन'ने दिलेल्या वृत्तनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे सीसीटीव्ही फोटेज डरहममध्ये असणाऱ्या ब्रँडन शहरातील आहे. ज्या ठिकाणी या चोराने 5 ऑक्टोबर रोजी गाडी चोरण्याचा प्रयत्न केला होता. सोशल मीडियावर लोकांनी 'कर्मा इज बॅक' असं म्हणत चोरावर टिका केली आहे.
Facebook वर हा व्हिडीओ गाडीचे मालक मार्टिन क्रेग यांनी शेअर केला. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हुडी जॅकेट वेअर करून गाडीजवळ येतो. त्यानंतर तो एक वीट आणून गाडीच्या काचेवर टाकतो. पण त्यामुळे गाडीची काच फुटत नाहीतर ती वीट उलटून चोराच्या तोंडावर जाऊन लागते.
व्हिडीओ शेअर करत क्रेनने लिहिलं की, 'या चांगल्या व्यक्तीने माझ्या गाडीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक प्रयत्नांनंतर या व्यक्तीला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. ज्याचा परिणाम त्याच्या चेहऱ्यावर झाला.' एक आठवड्याआधी शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ 24 हजार लोकांनी पाहिला आहे. याव्यतिरिक्त हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. मिररच्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीला गाडीला नुकसान पोहोचवण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.