Viral Video: 'तो' Anaconda चं शेपूट धरून पाण्यातून खेचू लागला अन्....बघा पुढे काय झालं...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 03:24 PM2020-06-30T15:24:54+5:302020-06-30T15:25:25+5:30
26 जून रोजी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आलाय. त्यानंतर आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक या व्हिडीओला व्ह्यूज मिळाले आहेत.
कधी कधी सोशल मीडियात असे व्हिडीओ व्हायरल होतात जे बघून धक्का बसतो आणि घामही फुटतो. एक असाच व्हिडीओ ट्विटरवर फार व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती एका भव्य अॅनाकोंडाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पण अॅनाकोंडाच्या पॉवरसमोर व्यक्ती काहीही करू शकत नाही. अॅनाकोंडा तिथून निघून जातो.
26 जून रोजी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आलाय. त्यानंतर आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक या व्हिडीओला व्ह्यूज मिळाले आहेत. तर सहा हजारपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला. तर तब्बल 1900 लोकांनी व्हिडीओ रिट्विट केलाय. तसा तर हा व्हिडीओ 2014 मधील आहे. पण पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— because men live less (@menlivesless) June 26, 2020
डेली मेलनुसार, हा व्हिडीओ ब्राझीलमधील आहे. येथील सांता मारिया नदीत एका नावेवर तीन लोक होते आणि एकाने एका भव्य अॅनाकोंडाची शेपटी पकडून त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. या अॅनाकोंडाची लांबी 17 फूट असल्याचं सांगितलं गेलं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साप पकडण्यावरून पर्यावरण पोलिसांनी तिन्ही लोकांना 600 डॉलर म्हणजे साधारण 45 हजार रूपयांचा दंड लावला होता. तसेच असेही सांगण्यात आले होते की, त्यांना 18 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षाही मिळू शकते. व्हिडीओत दिसणारा अॅनाकोंडा हा पिवळा अॅनाकोंडा आहे. हा या प्रजातीतील सर्वात छोटा साप मानला जातो. हा पाण्यातच राहणं पसंत करतो.
Viral Video : ...अन् त्याच्यासमोर अचानक 23 फूट लांब Anaconda आला, पुढे झालं ते पाहून फुटेल घाम!
Viral Video : बघा हरणाच्या चलाखीसमोर सिंहाचा झाला 'पोपट', कंट्रोल नसेल तर पॉवरचा काय फायदा!