सापाला वारंवार डिवचत होता, सापाने असा काही चावा घेतला की मरता मरता वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 03:32 PM2021-10-27T15:32:55+5:302021-10-27T15:33:41+5:30
एक व्यक्ती सापाचं लक्ष विचलित करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र, यानंतर जे काही घडलं ते पाहून सगळेच घाबरले.
सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Videos) होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक यूजर्स हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ एका सापाचा (Snake Video) आहे, यात एक व्यक्ती सापाचं लक्ष विचलित करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र, यानंतर जे काही घडलं ते पाहून सगळेच घाबरले.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतं, की एक काळा साप जमिनीवरुन चालला आहे. इतक्यात एक व्यक्ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान सुरुवातीला साप त्याच्यापासून वाचून पळण्याचा प्रयत्न करतो. मात्र, हा व्यक्ती वारंवार सापाला हात लावत असल्याने आणि पकडण्याचा प्रयत्न करत असल्याने साप त्याला चावतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सापाने चावल्यानंतर या व्यक्तीच्या बोटांमधून रक्त येऊ लागतं. हा व्यक्तीदेखील वारंवार कॅमेऱ्यात हे रक्त दाखवू लागतो.
काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर royal_pythons_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरनं याला कॅप्शन देत लिहिलं, 'फ्लोरिडाचा सर्वात मोठा वाटर स्नेक आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला आहे. साप सहसा भरपूर रागीट असतात मात्र ते हल्ला करण्याऐवजी आपला जीव वाचवून पळण्याला अधिक प्राधान्य देतात. परंतु सापांच्या काही प्रजाती अशाही असतात ज्यांना वारंवार त्रास दिल्यास ते मागे वळून तुम्हाला चावूही शकतात. यामुळे या जीवाला त्रास न देण्यातच भलं आहे'. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर झाल्यापासून आतापर्यंत १८ हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं यावर कमेंट करत लिहिलं, या व्यक्ती सापाला पकडलंच का, तेही दोन वेळा. दुसऱ्या एकानं कमेंट करत लिहिलं, वाटर मोकासिन विषारी असतात. फ्लोरिडामध्ये हे साप भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात.