Viral Video: अंगातली मस्ती नडली! बिबट्यासोबत मस्करी करायला गेला, बिबट्याने जे केलं ते पाहुन बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 01:09 PM2022-02-13T13:09:46+5:302022-02-13T13:09:55+5:30
एक हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) झाला आहे. यात एका व्यक्तीने जंगली प्राण्याला त्रास देण्याची चूक केली आणि मग जे काही घडलं, ते खरंच धक्कादायक आहे.
शिकारी प्राणी हा नेहमी शिकारीच राहातो, असं म्हटलं जातं. मग तो प्राणी पिंजऱ्यात बंद का असेना. तो आपला आक्रमक अंदाज कधीच बदलत नाही. जंगली प्राण्यांना बघण्यासाठी अनेकजण प्राणिसंग्रहालयात फिरण्यासाठी जातात. मात्र अनेकदा लोक आपल्या छोट्याशा चुकीमुळेही मोठ्या अडचणीत येतात. सध्या असाच एक हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) झाला आहे. यात एका व्यक्तीने जंगली प्राण्याला त्रास देण्याची चूक केली आणि मग जे काही घडलं, ते खरंच धक्कादायक आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की झुडपांच्या जवळ असलेल्या लोखंडाच्या पिंजऱ्यात एक बिबट्या कैद आहे. यादरम्यान एक व्यक्ती हातात काठी घेऊन तिथे जातो आणि बिबट्याला काठीने डिवचण्याचा प्रयत्न करतो. मात्र बिबट्या हे लाकूड आपल्या दातांमध्ये पकडतो आणि त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो. व्यक्तीच्या या कृत्यामुळे बिबट्या चवताळतो आणि मग जोरात काठीसह या व्यक्तीला पिंजऱ्याकडे खेचतो (Leopard Attack). पिंजऱ्याच्या जवळ जाताच हा व्यक्ती जोरात ओरडू लागतो. मात्र तिथे उपस्थित असलेला दुसरा व्यक्ती त्याला वाचवतो.
हा व्हिडिओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, “तत्काळ कर्म…शेवटपर्यंत पाहा. वन्य प्राण्यांच्या जवळ कधीही जाऊ नका, विशेषतः जेव्हा ते तणावात असतात." बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ ३५ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Instant karma… see till the end.
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 4, 2022
Never get close to wild animals. And particularly when they are in stress. pic.twitter.com/Br5m3Uml1P
एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, या घटनेनंतर आता हा व्यक्ती आयुष्यभर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करेल. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, पुढच्या वेळी एखाद्याला त्रास देताना शंभर वेळा विचार करेल. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.