Man using mobile driving bicycle : सायकलवर असताना मोबाईल बघत होता, काही सेंकंदातच झालं असं काही, १० लाखवेळा पाहिला गेला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 03:15 PM2021-04-08T15:15:39+5:302021-04-08T15:28:35+5:30
Man using mobile driving bicycle : सीसीटिव्ही फुटेजमधील वेळेनुसार ही घटना ४ एप्रिलला घडली असल्याचं समोर येत आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणं यात काहीच नवीन नाही. पण अनेकदा असे नियम न पाळणं जीवावर बेतू शकतं. एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बहुतेक वेळा असे दिसते की गाडी चालविताना मोबाईल वापरल्यामुळे रस्ते अपघात होतात. यावेळीसुद्धा असेच काहीसे पाहायला मिळाले.
एक मुलगा मोबाईल वापरताना सायकल चालवत होता (Man Using Mobile While Driving Bicycle) काही अंतर गेल्यानंतरच असा अपघात झाला, ज्याने सर्वांना चकित केले. तो सरळ एका कारकडे गेला आणि क्रॅश इन टू ए कारला ठोकला. हा व्हिडिओ माजी अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू रेक्स चॅपमनने (Rex Chapman) शेअर केला आहे.
Don’t text and bike... pic.twitter.com/ejg8DrySSS
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) April 7, 2021
सीसीटीव्ही व्हीडिओमध्ये हे दिसू शकते की मुलगा मोबाईल वापरत असताना सायकल चालवित आहे. तो पुढे जात असताना कार पार्किंगच्या ठिकाणी गाडी उभी असते. त्यानं कार न पाहिल्यामुळे कारला धडक देतो. सायकलचा वेग कमी होता, त्यामुळे मोठा अपघात झाला नाही. सायकलचा वेग जास्त असता तर या मुलाला गंभीर दुखापत झाली असती. रॅक्सचॅपमन या सोशल मीडिया युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून बाईक चालवताना मोबाईलचा वापर करू नका असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.....
हा व्हिडीओ ७ एप्रिलला सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त व्हिव्हज या व्हिडीओला मिळाले आहेत. तर २६ हजारांपेंक्षा जास्त लाईक्स आणि कमेंट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. सीसीटिव्ही फुटेजमधील वेळेनुसार ही घटना ४ एप्रिलला घडली असल्याचं समोर येत आहे. दणका! मास्क नाही म्हणून पोलिसांनी हातावर मारला 'असा' शिक्का, जेल मध्ये लिहायला लावला निबंध