बापरे! भर रस्त्यात ट्रकच्या टायरवर चढून तरूणाचा खतरनाक स्टंट; व्हिडीओ पाहून तुम्हीही हादराल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 01:01 PM2021-05-10T13:01:58+5:302021-05-10T13:05:48+5:30

Man walks on truck tyre stunts goes viral : व्हिडीओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की बरीच वाहने रस्त्यावर धावत आहेत आणि हा मुलगा रस्त्याच्या कडेला टायर घेऊन उभा असतो.

Man walks on truck tyre stunts goes viral ips gives epic reaction watch video | बापरे! भर रस्त्यात ट्रकच्या टायरवर चढून तरूणाचा खतरनाक स्टंट; व्हिडीओ पाहून तुम्हीही हादराल

बापरे! भर रस्त्यात ट्रकच्या टायरवर चढून तरूणाचा खतरनाक स्टंट; व्हिडीओ पाहून तुम्हीही हादराल

googlenewsNext

सोशल मीडियावर स्टंटबाज तरूणांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कधी हे व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्य वाटतं तर अनेकदा हेच स्टंट जीवघेणे सुद्धा ठरतात. सध्या  सोशल मीडियावर एका  तरूणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. 

भर रस्त्यात टायरवर चढून हा मुलगा एका पायाने टायर चालवत आहे. (Man Walks On Truck Tyre)  हा स्टंट करण्यासाठी त्यानं दुसऱ्या पायाचा आधारही घेतलेला नाही. आईपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच गमतीदार रिएक्शन्सही दिल्या आहेत. 

बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो

व्हिडीओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की बरीच वाहने रस्त्यावर धावत आहेत आणि हा मुलगा रस्त्याच्या कडेला टायर घेऊन उभा असतो. त्यानंतर तो टायर रस्त्यावर आणून त्यावर उभा राहतो आणि पायाने  चालवू लागतो. पुढे गेल्यानंतर तो पुन्हा परत येऊ लागतो. व्हिडिओ शेअर करताना आयपीएस अधिकाऱ्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या तरूणात टँलेंट आहे अन् हिंमतही...' 

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

८ मार्चला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओला १०० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून अनेकांना हा व्हिडीओ रिट्विटही केला आहे. 

Web Title: Man walks on truck tyre stunts goes viral ips gives epic reaction watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.