वैतागून कुत्रा विकायला निघाला मालक, लोक म्हणाले, आम्ही पैसे देतो पण कुत्रा तुझ्याकडेच ठेव!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 02:37 PM2019-05-28T14:37:24+5:302019-05-28T14:39:12+5:30

या व्यक्तीने ट्विटरवर याचा एक व्हिडीओ शेअर केला आणि पोस्ट लिहिली की, त्यांना त्यांच्या कुत्र्याच्या भुंकण्याच्या स्टाइलमुळे अनेकदा लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो.

This man want to sell his dog because he is ashamed everytime it barks | वैतागून कुत्रा विकायला निघाला मालक, लोक म्हणाले, आम्ही पैसे देतो पण कुत्रा तुझ्याकडेच ठेव!

वैतागून कुत्रा विकायला निघाला मालक, लोक म्हणाले, आम्ही पैसे देतो पण कुत्रा तुझ्याकडेच ठेव!

Next

सर्वात प्रामाणिक प्राणी कोणता असं विचारलं तर लोक क्षणाचाही उशीर न लावता कुत्रा असं उत्तर देतील. मनुष्याच्या सर्वात चांगल्या मित्रातही कुत्र्यांचाच समावेश आहे. त्यामुळेच अनेकजण घरात कुत्रा पाळतात. काही लोकांकडे तर एकापेक्षा अधिक पाळीव कुत्री असतात. पण एक व्यक्ती त्याच्या कुत्र्याला इतका वैतागला आहे, तो त्याला विकायला निघालाय. 

या व्यक्तीने ट्विटरवर याचा एक व्हिडीओ शेअर केला आणि पोस्ट लिहिली की, त्यांना त्यांच्या कुत्र्याच्या भुंकण्याच्या स्टाइलमुळे अनेकदा लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. पण लोकही फार हुशार आहेत. काही लोकांनी त्यांना उत्तर दिले की, 'पैसे आम्ही तुम्हाला देऊ, पण कुत्रा तुमच्याकडेच ठेवा'.


Zwide नावाच्या यूजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. २६ सेकंदाच्या या व्हिडीओ त्यांना काळा कुत्रा भुंकत आहे. पण त्याचा आवाज मात्र बकरीसारखा येतो. या आवाजावरून हा नेमका कुत्रा आहे की, बकरी किंवा अजून वेगळा प्राणी आहे का? असा प्रश्न पडतो. 


मजेदार बाब ही आहे की, हा कुत्रा ट्विटरवर फार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३.०९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर हे ट्विट २ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाइक केलंय. तर ३ हजारपेक्षा अधिक कमेंट्स आल्या आहेत'.









काही लोक कुत्र्याबाबतची त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'नाही, धन्यवाद! आम्ही सगळे तुम्हाला पैसे देऊ, पण हा कुत्रा तुम्ही तुमच्याकडेच ठेवा'.

Web Title: This man want to sell his dog because he is ashamed everytime it barks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.