अरेरे! खिडकीतून कचरा फेकता फेकता तोल गेल्यानं स्वतःच खाली पडला; अन् मग, पाहा व्हिडीओ.....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 02:14 PM2021-02-10T14:14:59+5:302021-02-10T14:20:48+5:30
Trending Viral News in Marathi : कचरा वाला प्रत्येकाच्या दारात येऊन कचरा घेऊन जातो किंवा खिडकीतून पिशवी खाली फेकली जाते अशी अनेक दृश्य तुम्ही पाहिली असतील.
साधारपणपणे शहरांमध्ये पाहिलं जातं की लोक घरच्याघरी डस्टबिनमध्ये कचरा फेकतात. कचरावाला आल्यानंतर बिल्डींगच्या खाली जायलाही लोक कंटाळा करतात. कचरा वाला प्रत्येकाच्या दारात येऊन कचरा घेऊन जातो किंवा खिडकीतून पिशवी खाली फेकली जाते अशी अनेक दृश्य तुम्ही पाहिली असतील. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खिडकीतून कचरा फेकणं किती जीवघेणं ठरू शकतं.
कचरा फेंकना है,
— Dipanshu Kabra (@ipskabra) February 9, 2021
कचरे के साथ फेंका नहीं जाना है😅.
रोज़मर्रा के कामों में भी ज़रा सी लापरवाही से बड़ी घटनाएं हो सकती है. इसलिए हमेशा सावधान रहें, ऐसे शॉर्टकट से बचें एवं घर में ऐसा कोई स्थान है जिससे दुर्घटना हो सकती है तो बचाव के उचित उपाय करें. जैसे कि ऊंची बॉउंड्री बनवाना आदि pic.twitter.com/eBR0ZR5jwl
आयपीएस अधिकारी दिपांशू काब्रा यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, कचरा फेकायचा आहे. कचऱ्यासोबत स्वतःला फेकायचं नाही आहे. रोजच्या कामांमध्ये थोडाजरी निष्काळजीपणा दाखवला तरी मोठी घटना घडू शकते. अश्या शॉर्टकट पासून नेहमी सावध राहा. ज्याठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी अधिक सर्तक राहायला हवं.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक कचऱ्याची गाडी येते. त्यानंतर खिडकीत बसलेला माणूस कचरा टाकण्यासाठी खिडकीच्या बाहेर हात काढतो. कचरा टाकताना तोल गेल्यानं तो माणूस खाली पडतो. सुदैवानं जमिनीवर न आदळता हा माणूस गाडीत पडतो. त्यामुळे जास्त मार लागत नाही. हा व्हिडीओ बघताना लोकांना खूप हसू आलेले पाहायला मिळतं. दरोडेखोरांनी सारं लुटून नेलं; पण 'ती' मागे हटली नाही; १०० रूपयांमध्ये वाढविला चिप्सचा बिझनेस
नेटिझन्सनी विनोदी कमेंट्स या व्हिडीओवर दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट केली आहे की, 'लहान रस्ते आपल्याला लहान बनवतात. ' जर तुम्हीसद्धा कोणाला अश्या पद्धतीनं कचरा टाकताना पाहात असाल तर हा व्हिडीओ त्यांना नक्की दाखवा. खरंच? रबरासारखं लवचीक आहे १३ वर्षांच्या चिमुरडीचं शरीर; लॅपटॉप चालवणं, होमवर्क सगळं काही करते पायानं