लय भारी! लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; अन् आता चहाचा बिझनेस करून घेतोय लाखोंची कमाई

By manali.bagul | Published: November 9, 2020 05:41 PM2020-11-09T17:41:34+5:302020-11-09T18:04:26+5:30

Inspirational stories in Marathi :उत्तराखंडमधील अल्मेडा जिल्ह्यातील नौवाडा गावात वास्तव्यास असलेल्या या तरूणाने हर्बल चहा तयार करण्याचा व्यवसाय करायचं ठरवलं. या तरूणाची ही कल्पना यशस्वी ठरली.

Man who loses his job in corona time now earning lakhs in per month from local tea | लय भारी! लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; अन् आता चहाचा बिझनेस करून घेतोय लाखोंची कमाई

लय भारी! लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; अन् आता चहाचा बिझनेस करून घेतोय लाखोंची कमाई

Next

कोरोनाकाळात सगळ्यांनाच अनपेक्षित स्थितीचा सामना करावा लागला. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे कामधंदे ठप्प पडल्याने अनेकांना नोकरी गमवावी लागली.  मिळकत पूर्णपणे बंद झाल्याने अनेकांनी कमाईचे वेगवेगळे मार्ग शोधायला सुरूवात केली तर काहीजणांनी गाव गाठलं.  सध्या सोशल मीडियावर लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या होतकरू तरूणाची कहाणी व्हायरल होत आहे. उत्तराखंडमधील अल्मेडा जिल्ह्यातील नौवाडा गावात वास्तव्यास असलेल्या या तरूणाने हर्बल चहा तयार करण्याचा व्यवसाय करायचं ठरवलं. या तरूणाची ही कल्पना यशस्वी ठरली.

इंडिया टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, आज  हर्बल चहाची मागणी वाढल्यामुळे हा तरूण १ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न घेत आहे. मानसिंग यांनी सांगितले की, ''आमच्या गावातून बरेच तरूण पलायन करतात. कारण रोजगाराचा अभाव ही सगळ्यात मोठी समस्या आहे.  सध्या कोरोनाकाळात इम्यूनिटी बुस्टर पदार्थांचे सेवन करत असल्यामुळे आम्ही तयार करत असलेल्या हर्बल चहाला मागणी वाढेल. हीच कल्पना डोक्यात ठेवून गावातील गवाताच्या साहाय्याने ही चहा तयार करण्याचा विचार केला. या खास प्रकारच्या गवताचा वापर करून काढा तयार केल्यास सर्दी, खोकल्याच्या समस्या दूर होण्यास मदत मिळत होती.''

पुढे त्यांनी सांगितले की, '' एक ते दोनवेळा प्रयोग केल्यानंतर हा चहा उत्तम तयार होऊ लागला. सुरूवातीला मी माझ्या  मित्रांना याबाबत माहिती दिली.  त्यानंतर ऑडरर्स यायला सुरूवात झाली. त्यामुळे माझे मनोबल वाढले.  ऑडर्स जास्त प्रमाणात यायला लागल्यानंतर मी अॅमेझॉनवरही हर्बल चहा विकण्यास सुरूवात केली.''  अशक्य! फक्त १५ सेकंदात या चौघी मिळून झाल्या वाघ; विश्वास बसत नाही?, मग पाहा व्हिडीओ

गावातील इतर लोकांनीही प्रयोग करायला सुरूवात केली आहे. घरातील  मोठ्या, वयस्कर लोकांनी वापरलेल्या घरगुती उपायांमुळेच दानसिंग यांना ही कल्पना सुचली. या कल्पनेमुळे आज दानसिंग लाखोंची कमाई घेऊन आपलं घर चालवत आहेत.  ५०० किलो हर्बल चहा विकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नोकरी गेली म्हणून हार न मानल्याचे चांगले फळ त्यांना मिळाले आहे. हृदयद्रावक! ....म्हणून मोठ्या संख्येने प्राण्यांना गमवावं लागलं घर; समोर आले भीषण फोटो

Web Title: Man who loses his job in corona time now earning lakhs in per month from local tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.