गणितावर किती ते प्रेम! कारवर लिहिले होते 4x4, एकाने दगड उचलला आणि गणित सोडवले..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 03:48 PM2021-08-03T15:48:46+5:302021-08-03T15:49:44+5:30
हा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या व्हायरल होतोय. यातील गंमत म्हणजे यात एक गणिततज्ज्ञ आहे.
इंटरनेटवर अनेक व्हिडिओ असतात त्यातील विनोदी व्हिडिओंना नेटकऱ्यांची खास पसंती मिळते. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर सध्या व्हायरल होतोय. यातील गंमत म्हणजे यात एक गणिततज्ज्ञ आहे.
Task completed 😁😁 pic.twitter.com/QBEouHAtZs
— Pankaj Nain IPS (@ipspankajnain) July 29, 2021
सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होतोय. यात रस्त्यावर एक कार उभी असते. त्यावर 4x4 असे लिहिलेले असते. याचा अर्थ असा असतो की अशा गाड्या ऑल व्हिल ड्राईव्ह सिस्टीम (All Wheel Drive System)युक्त असतात. अशा गाड्या डोंगर, दऱ्या, दलदल, खडबडीत रस्ते यावर धावू शकतात. मात्र, एक माणूस त्याला गणित समजून ते सोडवतो. त्याला वाटत 4x4 म्हणजे ४ गुणिले ४. तो खाली पडलेला चॉक उचलतो आणि त्यावर १६ असं उत्तर लिहितो. हे उत्तर लिहिल्यावर त्याला भरपूर आनंद होतो. या माणसाला त्या 4x4 हे चिन्ह आहे हे माहित नसते. त्यामुळे तो असं करतो.
मतलब बंदे की गणित तगड़ी है 😊
— Dolat Delu💙 (@DolatDelu) July 29, 2021
गणित का बहुत बड़ा ज्ञानी लगता है🤣🤣
— Amit Saroha (@AmitParalympian) July 29, 2021
सोशल मिडियावर हा व्हिडिओ जो पाहतोय तो तुफान हसतोय. कमेंटमध्ये त्या माणसाची मजा घेतोय. आयपीएस पंकज नैन यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर त्यांनी मजेशीर कॅप्शनही लिहिलीये. त्यांनी म्हटलंय, टास्क कम्पिलेटेड!