बाबो! योगा मॅटचा असा वापर पाहून बिथरले सोशल मीडियातील लोक, म्हणाले - तुझे पाय कुठे आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 03:50 PM2020-08-11T15:50:25+5:302020-08-11T15:51:03+5:30
@MindExcavator या ट्विटर यूजरने एक फोटो शेअर केला असून त्यावर लिहिले की, 'मी रोज माझ्या योगा मॅटचा वापर करत आहे'. पण मॅटचा असा वापर पाहून लोकांची बोलती बंद झाली आहे. कारण योगा मॅटचा असा वापर त्यांनी कधी पाहिला नाही.
योगा सुरू करायचं असेल तर त्यासाठी इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. पण काही लोक आधी योगा मॅट खरेदी करतात आणि नंतर योगाभ्यास करताना वापरायचे कपडे. त्यानंतर हे लोक सकाळी लवकर उठून आसन करू लागतात. काही दिवसांनी या लोकांना योगा करण्याचा उत्साह गायब होतो. मग या लोकांनी खास खरेदी केलेली मॅट आणि कपडे घरातील एक कोपऱ्यात धूळ खात पडलेले असतात. पण एका व्यक्तीने हीच योगा मॅट एका अशा कामासाठी वापरली की, लोक बघून अवाक् झालेत.
@MindExcavator या ट्विटर यूजरने एक फोटो शेअर केला असून त्यावर लिहिले की, 'मी रोज माझ्या योगा मॅटचा वापर करत आहे'. पण मॅटचा असा वापर पाहून लोकांची बोलती बंद झाली आहे. कारण योगा मॅटचा असा वापर त्यांनी कधी पाहिला नाही.
I use my yoga mat daily.
— Brain Nibbler (@MindExcavator) August 7, 2020
Khareedi hai to paise waste nahi hone chahiye. pic.twitter.com/47m89y5G32
हा फोटो व्यवस्थित बघा. बघा यात ही व्यक्ती योगा करण्यासाठी आणलेल्या मॅटचा वापर कशाप्रकारे करत आहे. या व्यक्तीचं मत आहे की, आता पैसे देऊन खरेदी केलं आहे तर पैसे वाया जाऊ नये. याचाच फायदा घेत ही व्यक्ती चार्जिंगला लावलेला फोन ठेवण्यासाठी या मॅटचा वापर करत आहे.
I am sure the treadmill (if you have one) will be used for drying clothes 😊😊
— Sudha (@sweetsudha1) August 7, 2020
Sir! Charan kahan hain aapke 🙏
— Ruchira Ghosh (@RuchiraGhosh) August 7, 2020
Hahahahaha....same case here 😂😂😂...atleast i use it this way, mera side mein dhool kha raha hai 😭😭😭😭
— Womaniya (@skwantsitall) August 7, 2020
Mat kharida uske liye pic.twitter.com/I9UrXT5o1e
— Neall (@neall2020) August 7, 2020
🤣😂😂😂 pic.twitter.com/9OVgs3xVcv
— RITESH RAM GAMBHIRE. (@GambhireRitesh) August 8, 2020
बस ऐसे ही नियमित रूप जे योगा करो हमेशा full charged रहोगे pic.twitter.com/QYXqz6vnod
— Recycled Soul (@DabirSachin) August 8, 2020
— Chinmay (@chinmay_lp) August 8, 2020
सोशल मीडियातील लोकांना मॅट वापरण्याची ही पद्धत फारच आवडली. तर अनेकांनी त्या व्यक्तीला वेड्यात काढलं. या फोटोला अडीच हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर ३५० पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. यावरून ही पोस्ट लोकांना किती आवडली हे दिसून येतं. कमेंट तर अशा आहेत की पोट धरून हसाल.
हे पण वाचा :
तिसरा डोळा! 'या' फोटोत लपलंय एक हरिण, सापडल्यावर जागेवरच मारू लागला उड्या!
याला म्हणतात जुगाड! ऑनलाईन शिकवण्यासाठी बाईंनी वापरला फ्रिजचा ट्रे; फोटो व्हायरल
युवकाला शिक्षण अर्धवट सोडून खोदावी लागतेय विहिर; १० तास मजुरी करुन मिळतात ३०० रुपये