#Manipalsuitcase : तरूणीला सुटकेसमध्ये भरून हॉस्टेलच्या बाहेर नेत होता विद्यार्थी, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 03:41 PM2022-02-03T15:41:42+5:302022-02-03T15:41:55+5:30

#ManipalSuitcase : या दाव्यासोबत घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर काही यूजर्सनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ हजारो वेळा पाहिला गेलाय. अनेक ट्विटर यूजर्स या व्हिडीओवर कमेंट करत आहे.

Manipal suitcase twitter trends student hides girlfriend inside suitcase, hostel guard caught video viral | #Manipalsuitcase : तरूणीला सुटकेसमध्ये भरून हॉस्टेलच्या बाहेर नेत होता विद्यार्थी, व्हिडीओ झाला व्हायरल

#Manipalsuitcase : तरूणीला सुटकेसमध्ये भरून हॉस्टेलच्या बाहेर नेत होता विद्यार्थी, व्हिडीओ झाला व्हायरल

Next

सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यात दावा केला जात आहे की, काही तरूण एका तरूणीला सुटकेसमध्ये लपवून हॉस्टेलच्या (Girl In Suitcase) बाहेर नेत होते. मात्र, गार्ड चेकिंग दरम्यान त्यांचा हा कारनामा पकडला गेला. सध्या या घटनेची ट्विटरवर चर्चा रंगली आहे.

या दाव्यासोबत घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर काही यूजर्सनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ हजारो वेळा पाहिला गेलाय. अनेक ट्विटर यूजर्स या व्हिडीओवर कमेंट करत आहे. ट्विटरवर Manipal Suitcase असा ट्रेन्ड सुरू आहे.

कथितपणे सूटकेसमध्ये तरूणीला लपवून हॉस्टेलच्या बाहेर नेतानाचा व्हिडीओ ट्विटरवर खूप व्हायरल झाला आहे. व्हिडीओनुसार, एका कॉलेज हॉस्टेलच्या काही तरूणांनी एका मोठ्या सुटकेसमध्ये तरूणीला लपवलं आणि तिला बाहेर घेऊन जात होते. पण तेव्हाच गेटवर गार्डने त्यांना रोखलं. सुटकेसची झडती घेतली तर त्यातून तरूणी निघाली. हा व्हिडीओ कर्नाटकच्या मणिपालच्या विद्यार्थ्यांचा सांगितला जात आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाला असून ट्विटर यूजर्स यावर भरभरून कमेंट्स करत आहे. काही लोकांना हा व्हिडीओ फनी वाटला तर काहींना विद्यार्थ्यांचा हा कारनामा आवडला नाही. काही यूजर्स म्हणाले हा व्हिडीओ प्रॅंक असेल. एक तरूणी सुटकेसच्या आत कशी मावेल. एकाने लिहिलं की,, 'आपण योग्य वेळी कॉलेजमधून बाहेर पडलो. तर एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'गर्लफ्रेन्ड सुटकेसमध्ये फिरणं आवडत असेल'.
 

Web Title: Manipal suitcase twitter trends student hides girlfriend inside suitcase, hostel guard caught video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.