Manoj Tiwari: 'हर घर तिरंगा' रॅलीमध्ये मनोज तिवारींनी तोडले ४ नियम; कापले ४१ हजारांचे चलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 12:31 PM2022-08-04T12:31:38+5:302022-08-04T12:37:48+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशातील विविध भागांमध्ये 'हर घर तिरंगा' रॅलीचे आयोजन केले जात आहे.

Manoj Tiwari breaks 4 rules in 'Har Ghar Tiranga' rally, delhi traffic police cut 41 thousand fine  | Manoj Tiwari: 'हर घर तिरंगा' रॅलीमध्ये मनोज तिवारींनी तोडले ४ नियम; कापले ४१ हजारांचे चलन 

Manoj Tiwari: 'हर घर तिरंगा' रॅलीमध्ये मनोज तिवारींनी तोडले ४ नियम; कापले ४१ हजारांचे चलन 

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाहनानंतर देशातील विविध भागांमध्ये 'हर घर तिरंगा' रॅलीचे आयोजन केले जात आहे. दरम्यान भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी देखील मोटारसायकल रॅली काढून या अभियानात सहभाग घेतला. मात्र वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी त्यांना तब्बल ४१ हजारांचा दंड भरावा लागणार आहे. या मोटारसायकल रॅलीमध्ये त्यांनी हेल्मेट वापरले नव्हते, एवढेच नाही तर त्यांच्याकडे मोटारसायकल चालवण्याचा परवाना देखील नव्हता. मोटारसायकचे प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) आणि मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्यामुळे त्यांना एवढा दंड आकारला गेला. वाहतुक नियमांची पायमल्ली केली म्हणून दिल्ली पोलिसांनी त्यांना एवढा दंड आकारला आणि सर्वांचेच लक्ष वेधले. 

४१ हजारांचे कापले चलन 
हेल्मेट न वापरल्यामुळे १ हजार रूपये, पीयुसी सर्टिफिकेट नसल्यामुळे १० हजार रूपये, विना परवाना मोटारसायकल चालवली म्हणून ५ हजार रूपये याशिवाय नंबर प्लेट नसताना गाडी चालवली म्हणून ५ हजार रूपये आणि मोटारसायकलच्या मालकावर २० हजार रूपयांचा दंड लावण्यात आला आहे. एकूणच मनोज तिवारी यांच्या कडून ४१ हजार रुपयांचे चलन कापण्यात आले आहे. 

मनोज तिवारी यांनी आपली चूक झाली असल्याचे मान्य केले असून माफी मागितली आहे. "आज हेल्मेट न वापरल्यामुळे क्षमस्व. मी चलनाची रक्कम भरेन. आपल्या सर्वांना आवाहन करतो की हेल्मेट वापरल्याशिवाय दुचाकी वाहने चालवू नका. तुमच्या मित्रांना आणि घरच्यांना तुमची गरज आहे", असे ट्विट करत खासदार महोदयांनी आपली चुकीवर स्पष्टीकरण दिले. 

विविध भागात बाइक रॅलीचे आयोजन
देश स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. 'आजादी का अमृत महोत्सव' या अंतर्गत एका तिरंगा बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये केंद्रीय मंत्र्यांसोबत काही तरूण खासदारांनी सहभाग नोंदवला होता. लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे हा यामागील उद्देश आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. तसेच २ ऑगस्टपासून सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटोला तिरंगा लावण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.


 

Web Title: Manoj Tiwari breaks 4 rules in 'Har Ghar Tiranga' rally, delhi traffic police cut 41 thousand fine 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.