लग्न ठरल्यावर तरूणाने एक्स गर्लफ्रेन्डला केला मेसेज, दोघांचेही स्क्रीनशॉट झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 12:39 PM2019-07-23T12:39:20+5:302019-07-23T12:48:37+5:30
प्रेमात काय ताकद असते हे खरं प्रेम करणाऱ्या लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. मग ते प्रेम तुम्हाला मिळो अथवा न मिळो.
(Image Credit : The Modern Man) (प्रातिनिधीक फोटो)
प्रेमात काय ताकद असते हे खरं प्रेम करणाऱ्या लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. मग ते प्रेम तुम्हाला मिळो अथवा न मिळो. मुळात मिळवणं हा प्रेमाचा उद्देशच नाही. त्यामुळे जर प्रेम अर्धवट राहत असेल तर त्याचं वाईट वाटायला नको. अनेकजण प्रेम अर्धवट राहिल्याने जगण्याकडे नकारात्मकपणे बघायला लागतात. तर काही फारच सकारात्मक असतात. अशाच एका अर्धवट राहिलेल्या प्रेमाची अनोखी कहाणी सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
तरूणाचं लग्न होणार आहे आणि त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डला मेसेज केलाय. हा भावनिक मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
i-
— 𝙻𝚎𝚡 ♡ (@_xolexc) July 20, 2019
i’m speechless pic.twitter.com/i2EAiER60z
दोन्ही एक्स प्रेमींच्या मेसेजचे स्क्रीनशॉट ट्विटरवर @_xolexc नावाच्या यूजरने शेअर केले आहेत. या यूजरने या स्क्रीनशॉटला 'माझ्याकडे शब्द नाहीत', असं कॅप्शनही दिलं आहे.
मेसेजमध्ये तरूणाने त्याच्या एक्स गर्लफ्रेन्डचे धन्यवाद मानले आहेत. @_xolexc ला म्हणाला की, 'धन्यवाद मला चांगला माणूस बनवण्यासाठी'. मेसेजच्या सुरूवातीलाच तरूण एक्सला सांगतो की, त्याचं लग्न होणार आहे आणि त्याच्या होणाऱ्या बायकोलाही तो हा मेसेज करत असल्याचे माहीत आहे.
त्यानंतर तरूणाने एक मोठा मेसेज लिहिलाय. त्यात त्याने लिहिले की, 'मला नेहमीच प्रोत्साहित करण्यासाठी धन्यवाद, मला अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी धन्यवाद, मी आजारी किंवा उदास असताना माझी ज्याप्रकारे काळजी घेतली त्यासाठी धन्यवाद. माझ्यावर प्रेम करण्यासाठी धन्यवाद'.
तरूणाच्या या मेसेजवर त्याच्या एक्सने काय रिप्लाय केला हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यावर तिने रिप्लायचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केलाय. तिने लिहिले की, 'प्रत्येकाने मला विचारले की, यावर मी काय दिला. मी जे लिहिले ते हे आहे. मी खरंच निशब्द झाले होते आणि मला यावर काय उत्तर द्यावं हेच कळत नव्हतं. पण मी जे बोलले ते हे आहे'.
for everyone asking me what i replied to, this is what i replied. i was literally speechless an didn’t know what to say but that’s what i said . pic.twitter.com/Zwkh0iAr2i
— 𝙻𝚎𝚡 ♡ (@_xolexc) July 21, 2019
दोघांचेही मेसेज वाचून सोशल मीडियातील लोक भावूक झाले आहेत. लोकांनी दोघांच्याही या संभाषणाला एक मॅच्युअर म्हणजेच परिपक्व संभाषण म्हटलं आहे.
I respect messages like this when they’re genuine because this is something I do when I’m feelin some type of way and need to let it out ❤️
— Jase (@jcag64) July 20, 2019
some lessons take time to be understood, unfortunately we are sometimes still just caught up in moment of it all and only after looking back can we better ourselves on our own failings.
— Jason (@IssaLlif3) July 21, 2019
This has to be the most beautiful thing Ive read. Shout out to both of y'all for being such damn good people.
— Nickolas Rey Tamez (@nickolas_rey) July 20, 2019
“thank you for being my first love” ☹️ https://t.co/79bVwzDGWO
— tats (@tatsaurus) July 22, 2019
You would have to be an angel to have someone thank you for your time the day before their wedding 😢 https://t.co/YlpdIwxMOH
— Kels 💛 (@kels21thomp) July 22, 2019
You would have to be an angel to have someone thank you for your time the day before their wedding 😢 https://t.co/YlpdIwxMOH
— Kels 💛 (@kels21thomp) July 22, 2019