आता लढवा शक्कल! या 'भूल भुलैया'मधील अंगठी शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 12:07 PM2022-07-12T12:07:17+5:302022-07-12T12:11:13+5:30

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला ऑप्टिकल इल्युजनचा फोटो सर्वांनाच संभ्रमात टाकत आहे.

Many are failing to find the hidden ring in this optical illusion photo | आता लढवा शक्कल! या 'भूल भुलैया'मधील अंगठी शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम

आता लढवा शक्कल! या 'भूल भुलैया'मधील अंगठी शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम

Next

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे आपल्या डोळ्यांना फसवणे अथवा आपल्या डोळ्यांची परीक्षा घेणे असं बोललं तर काही वावगं ठरणार नाही. सोशल मीडियावर सध्या असाच एक फोटो खूप व्हायरल होत आहे जो पाहून सर्वचजण गोंधळून गेले आहेत. कारण या फोटोमध्ये लपलेली अंगठी शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे, ही अंगठी शोधताना सोशल मीडियावरील युजर्स चांगलेच संभ्रमात पडले आहेत. कारण अनेक वस्तूंनी भरलेल्या या फोटोत अंगठी शोधणे फार कठीण आहे. 

दरम्यान, या ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये एका 'भूल भुलैया' आहे, ज्यामधील छोटीशी हिऱ्याची अंगठी शोधण्याचे आव्हान देण्यात आलं आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक असे व्हायरल फोटो पाहिले असतील मात्र हा फोटो पाहून तुम्हीही नक्कीच गोंधळून जाल. फोटोमध्ये एखाद्या गार्डनसारखी कलाकृती साकारण्यात आली आहे, ज्यामध्ये ससा, फुलं, लाइटचा दिवा आणि छोटी-छोटी रोपं पाहायला मिळत आहेत. काही लोक फोटो पाहता क्षणी अंगठी दिसल्याचा दावा करत आहेत तर काहींना अंगठी शोधण्यात अपयश येत आहे. तुम्ही अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजनचे फोटो पाहिले असतील मात्र हा फोटो काहीसा वेगळा आहे कारण या फोटोमधील 'भूल भुलैया सर्वांनाच संभ्रमात टाकत आहे. 

भन्नाट फोटोची सोशल मीडियावर रंगली चर्चा
या भन्नाट फोटोला 'विलियम मे' यांनी रिडर्स डायजेस्ट या वेबसाइटवर शेअर केले आहे. तसेच अंगठी शोधण्साठी एक हिंट देखील देण्यात आली आहे. लपलेल्या या हिऱ्याच्या अंगठीचे बॅंड पिवळ्या रंगाचे असून त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा हिरा दडलेला आहे. तुम्हाला अंगठी शोधण्यात यश आले नसेल तर निराश होऊ नका. कारण आम्ही दिलेला फोटो पाहा आणि तुम्ही अंगठी शोधताना काय चूक केली ते तपासा. खालील फोटोमध्ये तुम्ही अंगठी पाहू शकता. मात्र या 'भूल भुलैया'मधील अंगठी शोधताना भल्याभल्यांना घाम फुटला आहे, काही सोशल मीडियावरील युजर्स हा फोटो आपल्या नातेवाईकांना पाठवून त्यांच्या बुद्धीची एकप्रकारे परीक्षाच घेत आहेत.

Web Title: Many are failing to find the hidden ring in this optical illusion photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.