देसी जुगाड! हे दुकान पाहून नेटकरी म्हणाले, टॅलेंट देशाच्या बाहेर जाता कामा नये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 02:35 PM2022-11-24T14:35:03+5:302022-11-24T14:39:59+5:30
सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक देसी झुगाड व्हायरल झाले आहे.
सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक देसी झुगाड व्हायरल झाले आहे. आपल्याकडे जेव्हा आपण कुठेतरी अडकतो आणि त्या समस्येवर उपाय सापडत नाही, तेव्हा त्याच्या आयुष्यात झुगाड प्रवेश करतो. सोशल मीडिया असे झुगाड व्हायरल होतात. नुकताच असा एक झुगाड व्हायरल झाला आहे.हा फोटो उत्तर प्रदेशमधील आहे.एका व्यक्तीने कारला आपल्या व्यवसायाचा आधार बनवला आहे. त्याने मारुती 800 वरील छत कापून त्याला दुकान बनवले आहे. हा फोटो पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
फेसबुकपासून सोशल मीडियापर्यंत सर्वच प्लॅटफॉर्मवर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याने ट्विट केले आहे. याला 'हे खूप नाविन्यपूर्ण आहे' अशी कॅप्शन दिली आहे.
एका युझरने लिहिले, भारतीय जुगाड, अतिक्रमणाची भीती नाही, जागेचे टेन्शन नाही' काही वापरकर्त्यांनी याला फिरते पान शॉप म्हटले. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर लोक त्या माणसाच्या दुकानापर्यंत पोहोचत आहेत आणि काही लोक असे जुगाड यापूर्वी पाहिले नसल्याचे सांगत आहेत.
Bathing Ninja Technique : थंडीत अंघोळ करण्याची निंजा टेक्निक; व्हायरल व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल
हा फोटो फोटोशॉपवर एडिट केलेला नाही. या सध्या एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या दुकानासाठी त्या व्यक्तीने भन्नाट आयडीया केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये हे दुकान चर्चेचा विषय बनले आहे.
कल शाम को मैं भाई की दुकान पर गया और एक मीठा पान खाया ।
— 🎭 मानव 😘❣️ 🇮🇳 (@MANAVSINGH_IND) November 23, 2022
अपनी रोजी रोटी कमाने के लिए भाई ने अच्छा दिमाग लगाया और कार को ही दुकान बना दिया । रोज रोज गुमटी हटाने से फुर्सत हो गई
भाई का स्वभाव बहुत अच्छा है और अपनी रोजी रोटी कमाने के लिए ऐसे कदम उठाना कोई गलत काम नही है
👌👌👍 pic.twitter.com/7U93xQ3ukZ
व्हायरल झालेल्या फोटोत जनी मारुती 800 कार दिसत आहे. या कराच्या छताची बाजू कापून काढली आहे. याला दुकान बनवले आहे.