Mcdonald’s च्या टोमॅटो सॉसमधून जिवंत किडे, व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 12:41 PM2018-10-09T12:41:08+5:302018-10-09T12:44:18+5:30
Mcdonald मध्ये जाऊन आपल्या आवडत्या पदार्थांवर ताव मारणे हे सर्वांनाच आवडतं. त्यावर टोमॅटो सॉस घेऊन त्याची चव आणखीन चांगली करणं हेही सर्वांना आवडतं.
Mcdonald मध्ये जाऊन आपल्या आवडत्या पदार्थांवर ताव मारणे हे सर्वांनाच आवडतं. त्यावर टोमॅटो सॉस घेऊन त्याची चव आणखीन चांगली करणं हेही सर्वांना आवडतं. पण आता तुम्ही असं करण्याआधी १० वेळा विचार कराल. कारण इंग्लंडच्या कॅम्ब्रिज शहरातील Mcdonald मध्ये कॅचअप डिस्पेंसरमधून जिवंत किडे निघाले आहेत.
टोमॅटो सॉसमधून किडे निघल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. बेला रिची नावाच्या एका महिलेने हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. तेव्हा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
Never going near the ketchup in @McDonalds again. For those of you who can’t tell, these are MAGGOTS pic.twitter.com/7B3khnDwME
— Isabella (@bellaritchie00) October 3, 2018
बेला रिची या महिलेचं म्हणनं आहे की, या जिवंत किड्यांची माहिती तेथील स्टाफला सुद्धा दिली. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर Mcdonald च्या एका प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला की, ही फार मोठी चूक होती. यासाठी त्यांनी माफीही मागितली आहे.