Video - वर्दीतील माणुसकी! रस्त्यावर पडली वृद्धाची डाळ; पोलिसांनी हाताने गोळा करून केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 01:06 PM2023-03-31T13:06:33+5:302023-03-31T13:07:05+5:30
एका गरीब वृद्धाला मदत करताना पोलिसांनी रस्त्यावर पडलेली डाळ गोळा केली आणि नंतर त्याला सुखरूप घरी सोडलं.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पोलिसांचा हळवा चेहरा समोर आला आहे. एका गरीब वृद्धाला मदत करताना पोलिसांनी रस्त्यावर पडलेली डाळ गोळा केली आणि नंतर त्याला सुखरूप घरी सोडलं. पोलिसांचे हे काम पाहून लोकांनी त्याचा व्हिडीओ बनवला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचं लोकांनी भरभरून कौतुक केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी मेरठमधील परतापूर पोलीस स्टेशन हद्दीतील उड्डाणपुलाजवळ एक वृद्ध व्यक्ती बाईकवरून डाळ घेऊन जात होता. अचानक त्या वृद्धाला चक्कर आली आणि काही वेळातच त्याच्या बाईकचा तोल बिघडला आणि तो खाली पडला. बाईक पडताच डाळीने भरलेलं पोतं खाली पडलं. त्यानंतरती डाळ रस्त्याच्या मधोमध सांडली.
#meerut#मेरठ पुलिस का मानवीय चेहरा, सड़क पर एक बुजुर्ग की दाल बिखर गई,
— shalu agrawal (@shaluagrawal3) March 29, 2023
इंसपेक्टर ने हाथों से दाल को समेटकर बुजुर्ग की मदद की। @meerutpolicepic.twitter.com/5ZaxuH0T4P
वृद्धाने यानंतर डोक्यावर बांधलेला टॉवेल काढला आणि त्यातून डाळ गोळा करायला सुरुवात केली. दरम्यान, उड्डाणपुलाजवळ पोलीस कर्मचारी ड्युटीवर होते. इन्स्पेक्टर रामफल सिंहही तिथे ड्युटीवर होते. एक वृद्ध व्यक्ती पडलेली डाळा गोळा करत असल्याचं पोलिसांना दिसताच पोलीसही तेथे पोहोचले. पोलिसांनी वृद्धाची बाईक उचलली आणि ती लावली. यानंतर स्वत: वृद्धासोबत रस्त्यावर बसून सर्व डाळ जमा केली.
रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊ नये आणि कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी दोन पोलिसांनी लाठ्या-काठ्या घेऊन सर्कल केलं. इन्स्पेक्टर आणि इतर पोलिसांनी पिशवीत भरली. पोलीस कर्मचारी डाळ गोळा करत असताना, त्याचवेळी तेथून जाणाऱ्या लोकांनी हे दृश्य पाहिले आणि त्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"