सॅल्यूट! कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तारेवरची कसरत; टायरचे पंक्चर काढून घर चालवणारी आई....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 06:06 PM2021-02-02T18:06:36+5:302021-02-02T18:16:18+5:30
Viral News in Marathi : या महिलेला पंक्चर काढताना पाहून सगळेचजण चकीत झाले आहेत. सोशल मीडियावरही या महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर एका महिलेची कहाणी व्हायरल होत आहे. तुम्ही क्वचित एखाद्या महिलेला जेसीबी किंवा ट्रकची दुरूस्ती करतान पाहिलं असेल. पण तेलंगणातील कोथागुडेमध्ये आपल्या पतीसह ऑटोमोबाईल दुकान चालवणारी महिला टायर्स दुरूस्त करून आपलं घर चालवत आहे. साधारपणपणे कोणत्याही सर्विसिंग सेंटरमध्ये पुरूषांना हे काम करताना पाहिलं जातं. या महिलेला पंक्चर काढताना पाहून सगळेचजण चकीत झाले आहेत. सोशल मीडियावरही या महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
The story of beautiful, strong and an inspiration for many - Adilaxmi and her family. God bless them pic.twitter.com/IeCMs88bEV
— Kavitha Kalvakuntla (@RaoKavitha) January 31, 2021
हा व्हिडीओ @RaoKavitha या युजरनं ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, सुंदर आणि सक्षम प्रेरणादायी कहाणी आदिलक्ष्मी आणि तिचे कुटुंब. देव त्यांना नेहमी खुश ठेवो. आतापर्यंत २१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून १ हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
शाळेच्या मैदानात पडलं मोठं उल्कापिंड; तपासणीनंतर नासाच्या वैज्ञानिकांना कळलं असं काही...
या २ मिनिट २० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला मोठ्या वाहनांपासून मोटारसायकल, ऑटोरिक्षापर्यंत सगळ्या गाड्याचे टायर्स दुरूस्त करत आहे. मोठ्या वाहानांचे वजनदार टायर्स ही महिला स्वतः उचलून ठेवते आणि दुरूस्त करते. तीन वर्षांपूर्वी आदिलक्ष्मी आणि त्यांचे पति वीरभद्रम यांनी कार रिपेअरिंगचे दुकान उघडले. हे दुकान उघण्यासाठी त्यांना आपलं घर गहाण ठेवावं लागलं होतं. पण हळूहळू सगळं बदललं.
याला म्हणतात कर्माची फळं! बंदूकीनं चिमणीवर लावला निशाणा अन् पंखांवर गोळी लागताच झालं असं काही
सुरूवातीला महिलेला पंक्चरचे काम करताना पाहून लोक त्या दुकानात जाणं टाळायचे. काही दिवसांनंतर आदिलक्ष्मीच्या कामात सुधारणा होत गेली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गाड्या रिपेअरिंगसाठी येऊ लागल्या. आता हे दुकान २४ तास सुरू असतं. याशिवाय ग्राहकांची संख्याही मोठी असते.