खाकीला सलाम! महिला पोलिसानं दिला बेवासराला मृतदेहाला खांदा अन् २ किमी केली पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 01:01 PM2021-02-02T13:01:15+5:302021-02-03T08:36:44+5:30

Trending Viral News in Marathi : अज्ञात माणसाच्या मृत्यूनंतर कशाचीही पर्वा न करता स्वतः खांदा देत स्मशानभूमीपर्यंत पोहोचवलं आहे.

Meet andhra pradesh woman sub inspector sirisha who carried unknown body for 2 km | खाकीला सलाम! महिला पोलिसानं दिला बेवासराला मृतदेहाला खांदा अन् २ किमी केली पायपीट

खाकीला सलाम! महिला पोलिसानं दिला बेवासराला मृतदेहाला खांदा अन् २ किमी केली पायपीट

Next

अनेकदा पोलिस कर्मचारी आपली जबाबदारी पूर्ण करत असताना अशी कामगिरी करतात ज्यामुळे मनापासून सलाम  ठोकावासा वाटतो. सध्या सोशल मीडियावर एका पोलिस कर्मचारी महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलच्या कोशी बग्गला पोलिस स्थानकातील  महिला उप निरिक्षक सिरीक्षा यांनी एक आदर्श घालून दिला आहे. त्यांनी एका अज्ञात माणसाच्या मृत्यूनंतर कशाचीही पर्वा न करता स्वतः खांदा देत स्मशानभूमीपर्यंत पोहोचवलं आहे.

या महिला पोलिसाला गवातील अज्ञात इसमाच्या मुत्यूची माहिती मिळताच  घटनेची अधिक  माहिती मिळवण्यासाठी त्या घटनास्थळी पोहोचल्या. चाचणीनंतर  शव अंतिम संस्कारासाठी  घेऊन जायचे होते. मृत इसम अनाथ असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी खांदा देण्यास नकार दिला.  त्यानंतर सिरीक्षा  यांनी स्वतः मृतदेह उचलायचं ठरवलं आणि दोन लोकांच्या मदतीनं या मृत इसमाला खांदा दिला. स्मशानात पोहोचल्यानंतर पोलिस समोर असतानाचा या माणसाचे अंतिमसंस्कार करण्यात आले. आंध्रप्रदेश पोलिसांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. जिद्दीला सलाम! महिलेला झाला होता कोरोना पण हिंमत सोडली नाही; रुग्णवाहिकेत बसून दिली परिक्षा

आंध्रप्रदेश पोलिसांनी या महिला पोलिसाचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण तब्बल २ किलोमीटर पायपीट करत ही महिला स्मशानभूमीपर्यंत पोहोचली. सोशल मीडियावर या महिला पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. आतार्यंत ८ हजारांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला असून १ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तर  ३०० पेक्षा जास्त रिट्विट्सही आहेत. वाह! वयस्कर जोडप्यानं धरला असा ठेका; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात.....

Web Title: Meet andhra pradesh woman sub inspector sirisha who carried unknown body for 2 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.