सोशल मिडियावर धुमाकुळ घालतेय 'या' युवकाची कथा, असं काय केलंय त्यानं? पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 05:17 PM2021-07-29T17:17:19+5:302021-07-29T17:18:16+5:30
सध्या बशीर मीर नावाचा युवक सोशल मिडियावर भलातच ट्रेंडिंग आहे. या युवकानं अशी कामगिरी केलीय की लोक त्याचं कौतुक करता करता थांबत नाहीयेत. त्याच्या धैर्यानं त्यांना भल्याभल्यांना लाजवेल असं काम केलंय. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की हा बशीर मीर नेमका आहे तरी कोण?
सध्या बशीर मीर नावाचा युवक सोशल मिडियावर भलातच ट्रेंडिंग आहे. या युवकानं अशी कामगिरी केलीय की लोक त्याचं कौतुक करता करता थांबत नाहीयेत. त्याच्या धैर्यानं त्यांना भल्याभल्यांना लाजवेल असं काम केलंय. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की हा बशीर मीर नेमका आहे तरी कोण?
Real Life #Hero from Ganderbal District. This man risked his life to rescue three young boys who were trapped in River Sindh in Ganderbal District. Cloud bursts caused flash floods in the area. pic.twitter.com/H7lgwLc1wu
— Rifat Abdullah رفعت عبداللہ (@rifatabdullahh) July 28, 2021
सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात तीन युवक नदीच्या मधोमध अडकलेले दिसत आहेत. जोराचा पाऊस पडतोय आणि नदीला पूर आलाय. अशा परिस्थीतीत कुणीही त्यांच्या जीवाची खात्री देऊ शकत नाहीये. ते युवकही भरपूर घाबरलेले आहेत. अशातच एक तरुण नदीत उडी मारतो आणि त्या धोधो वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह कापून सरळ पोहत जातो. तो त्या मुलांकडे पोहोचतो आणि दोरीच्या साह्य्याने त्यांना नदीतल्या त्या पुरातून बाहेर काढतो. हे दृश्य पाहिल्यावर तुमच्याही अंगावर रोमांच उभे राहिले असतील. या व्हिडिओमधला या तीन मुलांना वाचवणारा तरुण बशीर मीरच आहे.
Bashir Mir of Ganderbal has saved hundred of lives. Brave man Jumped into River Sindh in Ganderbal District and Saved three boys who were trapped in flood. Brave Kashmiri @BDUTT@islahmufti@shahfaesal@FahadZirarAhmad@SalmanNizami_@SaraHayatShah@sardesairajdeep#Kashmirpic.twitter.com/g4gGn2XS8s
— Guftar Ahmed (@GuftarAhmedCh) July 28, 2021
Bashir Mir of Kangan has saved hundred of lives. Brave man Jumped into River Sindh in Ganderbal District and Saved three boys who were trapped in flood. Proud of you 🙏 #brave#BashirMir sb. pic.twitter.com/W0s7OF4DXV
— Irfan Ahmad عرفان احمد (@irfanahmad230) July 29, 2021
काश्मीरमध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे सिंधु नदीचे पाणी वाढले आहे. एसडीआरएफचे जवान लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवत आहेत. लोकांनी मात्र मीरच्या या धैर्याला कडक सैल्युट ठोकलं आहे.