नादच खुळा! गोष्टीतला नाही तर खराखुरा चतूर कावळा; पाहा तहानलेल्या कावळ्याचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 03:11 PM2020-11-16T15:11:17+5:302020-11-16T15:29:33+5:30
Viral Video in Marathi : सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे.
आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी सोशल मीडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका तहानलेल्या कावळ्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला बालपण नक्की आठवेल कारण सगळ्यांनीच चतूर कावळ्याची गोष्ट वाचलेली किंवा ऐकलेली असते. तसंच काही वर्षांपूर्वी एका शीतपेयाच्या जाहिरातीतही तहानलेल्या कावळ्याची संकल्पना वापरून जाहिरात करण्यात आली होती. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही खराखुरा चतूर कावळा पाहू शकता. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे.
This crow has a degree in physics. pic.twitter.com/G1rvh4CqET
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) November 15, 2020
तुम्ही पाहू शकता या व्हिडीओत पाण्याची बाटली अर्धी भरलेली आहे. त्यामुळे या तहानलेल्या कावळ्याला पाणी पिता येत नाहीये. आपल्याला पाणी पिता यावं यासाठी कावळ्यानं आपलं डोकं चालवलं आहे. आजूबाजूला असलेले दगड पाण्यात टाकण्याचा प्रयत्न कावळा करत आहे. दगड टाकल्यांतर पाणी पिऊन कावळा पुन्हा दुसरा दगड आणण्यासाठी जात आहे. दोन ते तीन वेळा कावळ्याने सेम कृती केली आहे. जसं तुम्ही याआधी गोष्टीत कावळ्याच्या चरूराईचे वर्णन ऐकले असेल त्याच प्रमाणे या व्हिडीओमध्ये कावळा कृती करताना दिसून येत आहे. बापरे! ७ महिन्यांपासून पोटातून येत होता रिंगटोनचा आवाज; डॉक्टरांनी सर्जरी केली अन् मग....
आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्तवेळा हा व्हिडीलो पाहिला गेला असून १५ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. २ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ १२ सेकंदाचा असून सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तुझ्याविना करमेना! रुग्णालयानं ८१ वर्षांच्या पत्नीला भेटू दिलं नाही; म्हणून पतीनं काय केलं पाहा VIDEO