दारू प्यायल्यानंतर याने जे केलं ते ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 02:43 PM2019-10-13T14:43:53+5:302019-10-13T15:07:30+5:30

दारू प्यायल्यानंतर अनेक लोक चित्रविचित्र प्रकार करत असतात. अनेकदा दारूच्या नशेत केलेल्या लोकांच्या हरकती व्हायरल होत असतात. पण एका व्यक्तीने दारूच्या नशेत जे केले ते ऐकून तुम्ही हैराण व्हालच पण डोक्यावरही हात मारून घ्याल.

Meet this drunk guy goes for a little walk ends after 800 km | दारू प्यायल्यानंतर याने जे केलं ते ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्...

दारू प्यायल्यानंतर याने जे केलं ते ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्...

Next

दारू प्यायल्यानंतर अनेक लोक चित्रविचित्र प्रकार करत असतात. अनेकदा दारूच्या नशेत केलेल्या लोकांच्या हरकती व्हायरल होत असतात. पण एका व्यक्तीने दारूच्या नशेत जे केले ते ऐकून तुम्ही हैराण व्हालच पण डोक्यावरही हात मारून घ्याल. यूनिवर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये राहणाऱ्या एडवर्ड रूल अल्कोहोल प्यायल्यानंतर एक वेगळीच ट्रिप करून आला. आता तुम्ही म्हणाल की यामझ्ये हैराण होण्यासारखं आहे तरी काय? पण खरी गंमत तर पुढे आहे. 

एडवर्ड दारू प्यायल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडला पण तो मध्ये कुठेच थांबला नाही आणि नशेत तो चक्क 800 किलोमीटर पायी चालत गेला. 

नक्की का चालत सुटला एडवर्ड? 

दरम्यान, 20 वर्षीय एडवर्ड आपल्या मित्रांसोबत पार्टी करत होता. खरं तर हा कॉलेज ड्रॉपआउट आहे. दारू प्यायल्यानंतर थोडा वॉक करण्यासाठी हा बाहेर पडला अन् चालत सुटला. जेव्हा शुद्धीवर आला त्यावेळी तो स्वतःच्या घरापासून 804 किलोमीटर फ्रान्सच्या दक्षिण भागात पोहोचला होता. 

महिनाभर चालत होता... 

मीडियाशी बोलताना एडवर्डने सांगितले की, 'मला फार इच्छा होती स्पेनपर्यंत चालत जाण्याची. मागील महिन्यात माझ्या मित्रासोबत मी दारू पित होतो त्यावेळी मी चालण्यास सुरूवात केली. 20 किलोमीटर चालल्यानंतर मला जाणवलं आता इथून परतणं शक्य नाही. त्यावेळी माघार घेण्याऐवजी पुढे जाण्याचा विचार केला. 

रस्त्यात अनेक नवीन ओळखी झाल्या... 

एडवर्डला रस्त्यामध्ये काही चांगल्या व्यक्ती भेटल्या. त्यांनी त्याची फार मदत केली. आता तो लवकरच पॅरीसच्या ट्रिपसाठी जाणार आहे. पण तो पायीच जाणार आहे. 

Web Title: Meet this drunk guy goes for a little walk ends after 800 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.