Video : 'या' तरूणीचा भिंतीवर चढण्याचा स्पीड बघाल तर स्पायडर मॅनलाही विसराल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 01:07 PM2019-10-23T13:07:04+5:302019-10-23T13:11:36+5:30
Aries Susanti Rahayu असं या महिलेचं नाव असून तिने हा रेकॉर्ड कायम केला आहे.
इंडोनेशियामध्ये एका महिल क्लायंबरने रेकॉर्ड कायम केला आहे. Aries Susanti Rahayu असं या महिलेचं नाव असून तिने हा रेकॉर्ड कायम केला आहे. रेकॉर्ड हा आहे की, ती १५ मीटरची भिंत ६.९९५ सेकंदात चढली आहे. साधारणपणे स्पायडर मॅनला आपण सिनेमात वाऱ्याच्या वेगाने भिंतींवर चढताना पाहिले आहे. पण त्यानेही या महिलेचा व्हिडीओ पाहिला तर त्यालाही आश्चर्य वाटेल.
Women's speed climbing record was smashed. Under 7 seconds. Inhuman. pic.twitter.com/8EC1A1wE1O
— Mark Serrels (@Serrels) October 20, 2019
Aries ने हा कारनामा चीनमध्ये केला आहे. चीनमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. IFSC Climbing World Cup मध्ये तिने विजय मिळवला आहे. इतकेच नाही तर तिने रेकॉर्डही कायम केला आहे. तिने १५ मीटरची भिंत केवळ ६.९९९ सेकंदात पार केली.
my bones just screamed
— Jolly Gem (@GeeOfDee) October 20, 2019
Forget about spider man..this is Spider Woman Brilliant!!
— Max1 #Fightback (@Max10110199) October 21, 2019
If you are last you are not fast!!
Aries च्या कारनाम्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला असून लोक तिचं भरभरून कौतुक करत आहेत. महत्वाची बाब म्हणजे ही स्पर्धा पुरूष विरूद्ध महिला अशी होती. तिने पुरूष खेळाडूला मात दिली त्यामुळे तिचं अधिकच कौतुक होत आहे.