कौतुकास्पद! ७ वर्षांच्या चिमुरड्यानं एका मिनिटात मारले ५७१ बॉक्सिंग पंच; अन् केला वर्ल्ड रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 04:17 PM2020-11-18T16:17:46+5:302020-11-18T16:25:59+5:30
Inspirational Stories in Marathi : जेव्हा कोरोनामुळे भारतात लॉकडाऊन सुरू होतं. तेव्हा मार्टीनने वेळेचा सदूपयोग करत बॉक्सिंगचा सराव करायला सुरूवात केली.
हरिणायातील रहिवासी असलेल्या एका ७ वर्षांच्या चिमुरड्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ट्विटर या मुलाचा फोटो शेअर करत अभिनंदन केलं आहे. त्यांनी या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, फक्त सात वर्षाच्या मुलानं एका मिनिटात ५७१ बॉक्सिंग पंच मारून गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे. हरियाणाच्या मुलांच्या रगारगात शौर्य आणि खेळ आहे. असे म्हणत अभिनंदन आणि आशिर्वाद या ट्विटच्या माध्यमातून दिले आहेत.
सात साल की छोटी सी उम्र में एक मिनट में 571 बॉक्सिंग पंच मारकर 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकार्ड' में नाम दर्ज कराने पर सोनीपत के मार्टिन मलिक को शुभकामनाएं एवं आशीर्वाद।
— Manohar Lal (@mlkhattar) November 18, 2020
हरियाणा के बच्चों की रग-रग में खेल एवं वीरता बसी हुई है। pic.twitter.com/2FsbcWIRmm
मार्टीन मलिक सोनिपत जिल्ह्यातील बिधल हालचा रहिवासी आहे. मार्टिनने एका मिनिटात ५७१ वेळा बॉक्सिंग पंच मारून हा रेकॉर्ड केला आहे. दोन महिन्यांआधी इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बूक ऑफ रेकॉर्डमध्येही या चिमुरड्याचे नाव नोंदवण्यात आले होते. जेव्हा कोरोनामुळे भारतात लॉकडाऊन सुरू होतं. तेव्हा मार्टीनने वेळेचा सदूपयोग करत बॉक्सिंगचा सराव करायची सुरूवात केली. खूप कमी वेळात मार्टीनने आपल्य नावावर रेकॉर्ड केला आहे. हा रेकॉर्ड तोडणं या वयातील मुलांसाठी कठीण आहे.
भारीच! आता मास्कमुळे चष्म्यावर येणार नाही फॉग; व्हायरल झाली डॉक्टरांची भन्नाट ट्रिक
मार्टीनच्या वडिलांनी सांगितले की, ''लॉकडाऊनमुळे आमचा मुलगा खूप चिडचिड करत होता. म्हणून त्याच्या हट्टामूळे आम्ही त्याला बॉक्सिंग पंचिंग ग्लोव्हज घेऊन दिले. हळूहळू त्याचा वेग वाढू लागला होता. नंतर आम्ही त्याला पूर्ण सेट आणून दिला. त्याने अधिकाधिक मन लावून सराव करायला सुरूवात केली. आता मार्टीन सुभाष स्टेडियममध्ये सत्येंद्र कुमार यांच्याकडे प्रशिक्षण तसंच फिटनेसचे धडे घेत आहे. ''
सॅल्यूट! पत्नी अन् मुलीच्या आठवणीत गेल्या १० वर्षांपासून मोफत अन्न पुरवतोय 'हा' देवमाणूस