या पठ्ठ्याने एका फटक्यात केली युपीएससी क्लिअर, फक्त वापरली 'ही' ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 01:26 PM2021-09-30T13:26:31+5:302021-09-30T15:41:40+5:30

किती तरीजण कित्येक वर्षे अभ्यास, सराव करत असतात. पण पहिल्याच प्रयत्नात पास होतात असं नाही. त्यानंतर वारंवार परीक्षा देऊन काही जण उत्तीर्ण होतात. पण एका पठ्ठ्याने मात्र एकाच फटक्यात यूपीएससी क्लिअर करून दाखवली आहे.

Memes of UPSC exam trick to clear UPSC in single attempt viral meme | या पठ्ठ्याने एका फटक्यात केली युपीएससी क्लिअर, फक्त वापरली 'ही' ट्रिक

या पठ्ठ्याने एका फटक्यात केली युपीएससी क्लिअर, फक्त वापरली 'ही' ट्रिक

Next

आपण आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकारी व्हावं, असं स्वप्नं अनेकांचं असतं. ही पदं मिळवण्यासाठी यूपीएससीची (UPSC) परीक्षा द्यावी लागते. यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (Union Public Service Commission) ही परीक्षा. यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. किती तरीजण कित्येक वर्षे अभ्यास, सराव करत असतात. पण पहिल्याच प्रयत्नात पास होतात असं नाही. त्यानंतर वारंवार परीक्षा देऊन काही जण उत्तीर्ण होतात. पण एका पठ्ठ्याने मात्र एकाच फटक्यात यूपीएससी क्लिअर करून दाखवली आहे.

नुकताच यूपीएससीच्या २०२० सालच्या परीक्षेचा निकाल (UPSC Final Result 2020) जारी करण्यात आला. याबाबत बातम्या तर आल्या आहेत. पण सोबतच यासंबंधी बरेच मीम्सही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. यूपीएससबातच्या या मीम्समध्ये सोशल मीडिया युझरने अशक्यही शक्य करून दाखवलं आहे. यूपीएससी पहिल्याच प्रयत्नात क्लिअर करण्याची हटके ट्रिक या फोटोत दाखवण्यात आली आहे. फक्त एका फटक्यात त्याने यूपीएससी क्लिअर केली आहे.

फोटो पाहिला तर एका फोटोत UPSC असं लिहिलेलं आहे. तर दुसऱ्या फोटोत UPSC खोडरबरने खोडलं आहे. म्हणजे या फोटोतून UPSC हे क्लिअर कसं केलं हे दाखवण्यात आलं आहे. @m_idiotic  या ट्विटर अकाऊंटवर हा मजेशीर फोटो पोस्ट करण्यात आला आहे.  पहिल्याच प्रयत्न UPSC पास केलं, असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हा फोटो पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

Web Title: Memes of UPSC exam trick to clear UPSC in single attempt viral meme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.