कॅनेडिन व्यक्तीचा विश्वविक्रम! कमी वेळात १० किमी जॉगिंग करून मोडला गिनी वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 03:00 PM2022-07-15T15:00:46+5:302022-07-15T15:01:47+5:30

कॅनडातील एका धावपटूने आपल्या वेगाने धावण्याच्या कौशल्याच्या जोरावर एका नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.

Michael Bergeron, of Prince Edward Island in Canada broke Guinness World Record | कॅनेडिन व्यक्तीचा विश्वविक्रम! कमी वेळात १० किमी जॉगिंग करून मोडला गिनी वर्ल्ड रेकॉर्ड

कॅनेडिन व्यक्तीचा विश्वविक्रम! कमी वेळात १० किमी जॉगिंग करून मोडला गिनी वर्ल्ड रेकॉर्ड

Next

नवी दिल्ली

कॅनडातील एका धावपटूने आपल्या वेगाने धावण्याच्या कौशल्याच्या जोरावर एका नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे. या कॅनेडियन व्यक्तीने १० किलोमीटर जॉगिंग करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा विक्रम मोडला आहे. दरम्यान या धावपटूने केवळ ३४ मिनिटं आणि ४७ सेकंदांमध्ये १० किलोमीटर अंतर पार केलं. कॅनडातील प्रिन्स एडवर्ड आयलंडच्या मायकेल बर्गेरॉनने सर्वात कमी वेळात १० किमी अंतर गाठून विश्वविक्रम नोंदवण्याचा प्रयत्न केला. त्याने ३४ मिनिटांमध्ये हा पल्ला गाठून सर्वात जलद गतीने ३६ मिनिटं आणि २६ सेकंदांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.

यापूर्वी जॉगलरने २०१८ मध्ये हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याने ३६ मिनिटांत हे अंतर पूर्ण केलं होतं. मात्र काही तांत्रिक आधारांमुळे हे आव्हान अपात्र ठरले होते. आपल्या अविश्वसनीय कामगिरी बद्दल बोलताना मायकेल म्हणाला, "मी १.४० या अंतराने विक्रम मोडल्याने त्याचा मला फार आनंद आहे. मला आता खूप थकवा जाणवत आहे, माझे पाय दुखतायत पण यामुळे मी खूप आनंदी आहे. मायकेलच्या या विक्रमाचे पुरावे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने अधिकृतपणे सादर केले आहेत. 

अविश्वसनीय विजयाने पत्नीचा उत्साह शिगेला 

या विक्रमामुळे मी खूप आनंदी असल्याचे मायकेलची पत्नी जेनी ऑरने ट्रॅकवर फिरताना सांगितले. "मागील वेळी जेव्हा मायकेलने हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हाही मी त्याच्यासोबत होते. मात्र त्यावेळी याबाबत त्याच्या मनात संभ्रम होता म्हणून त्यावेळी तो खूप नाराज होता, म्हणूनच आज तो त्याचा पाठपुरावा करण्यासाठी खूप उत्सुक आहे. हे त्याचे यश शंभर टक्के मिळाले असून याबाबत मला काहीच शंका नाही." असे मायकेलच्या पत्नीने अधिक म्हटले. माहितीनुसार, या प्रतिष्ठित स्पर्धेतील जेतेपद मिळण्यापूर्वी जॉगलरने ऑक्टोबर २०१८ मध्ये स्टोटीबॅंक टोरंटो वॉटरफ्रंट मॅरेथॉनमध्ये (Scotiabank Toronto Waterfront Marathon)प्रसिद्ध वेगवान हाफ मॅरेथॉन धावपटूचा विक्रम मोडला होता. 
 

Web Title: Michael Bergeron, of Prince Edward Island in Canada broke Guinness World Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.